पुणेकरांनो, आता लवकरच फुले मिळणार मुबलक कारण...

Market_Yard.jpg
Market_Yard.jpg
Updated on

मार्केट यार्ड (पुणे) : गुलटेकडी मार्केट यार्डातील फुल बाजार मागील दोन महिन्यांपासून बंद आहे. संबधित अडते आणि शेतकऱ्यांकडून बाजार सुरू करण्याची मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर 15 जूननंतर बाजार सुरू करण्याचा विचार कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.

लॉकडाउन आल्याने शहरातील मंदिरे बंद आहेत. तसेच लग्नकार्यही फारशी होत नाहीत. त्यामुळे सोशल डिस्टनिंगचे पालन करण्याच्या अडचणीचा विचार करून अद्याप बाजार बंद ठेवण्यात आला आहे. परंतु, फुल बाजार अडते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क करून बाजार सुरू करण्याबाबत विचारणा केली आहे. शेतकऱ्यांकडूनही बाजार सुरू करण्याची मागणी होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून 15 जूननंतर अडते, शेतकऱ्यांशी संवाद साधून बाजार सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशमुख म्हणाले, मुख्य बाजार आवारात आणि उपबाजारात सोशल डिस्टनिंग पाळणे, थर्मलने तापमान तपासणे, सॅनिटायझर वापरणे, मास्क घातल्याशिवाय बाजारात प्रवेश नाही, यासह उपाययोजना बाजार समितीकडून करण्यात येत आहेत. तसेच मुख्य बाजार आवाराबरोबरच मोशी, मांजरी आणि उत्तमनगर येथील उपबाजार सुरू आहेत. करोन संसर्गाचा प्रादुर्भाव, काही दिवस बाजार बंद असणे, चक्रीवादळ हवामानात झालेला बदलामुळे सर्वच बाजारातील शेतीमालाची आवक कमी झाली आहे. काही दिवसातच परिस्थिती बदलल्यानंतर आवक पूर्वपदावर येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com