esakal | ...म्हणून भक्कम दिसणारी झाडे पावसाळ्यात पडतात उन्मळून
sakal

बोलून बातमी शोधा

tree1.jpg

वरवर चांगली आणि मजबूत दिसणारी झाडे क्षणार्धात कोसळत आहेत. त्यामुळे या पडणा-या झाडांना जबाबदार कोण ?  असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

...म्हणून भक्कम दिसणारी झाडे पावसाळ्यात पडतात उन्मळून

sakal_logo
By
संदीप जगदाळे

हडपसर (पुणे) : गेल्या दोन दिवसांपासून वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसात अनेक ठिकाणी झाड उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहे. महापालिकेच्या वतींने झाडांच्या फांद्याची योग्य प्रकारे छाटणी केल्यानंतरही ही झाडे पडू लागली आहेत. वरवर चांगली आणि मजबूत दिसणारी झाडे क्षणार्धात कोसळत आहेत. त्यामुळे या पडणा-या झाडांना जबाबदार कोण ?  असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

पुण्यातील काही उद्याने उघडली; पण...

पेव्हिंग ब्लॅाकच्या वाढत्या प्रस्थामुळंच झाडांच्या मुळांची वाढ खुंटत असून चांगली दिसणारी झाडं उन्मळून पडत आहेत. याबाबत वृक्ष अभ्यासक श्रीनाथ कवडे म्हणाले, झाडं ही मातीतच चांगली रूजली जातात आणि त्यांची पाळमुळं खोलवर पसरली जातात. या खोलवर पसरलेल्या मुळांमुळेच झाडांचा भार संभाळला जातो. उंचउंच पसरलेल्या झाडांचा तोल हा जमिनीत लांबपर्यंत पसरलेल्या मुळांद्वारे सांभाळला जातो. परंतु रस्त्यांचे काॅंक्रेटीकरण आणि पेव्हिंग ब्लॅाकमुळे झाडांची मुळं खोलवर रूजत नाहीत, तसंच आजुबाजूला पसरत नाहीत. परिणामी अनेकदा झाडांच्या फांद्या छाटूनही त्यांचा समतोल राखता येत नाही. त्यामुळे ब-याचदा चांगल, मजबूत दिसणार झाडंही अचानक पडतं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वनस्पती तज्ञ श्रीकांत अभ्यंकर म्हणाले, शहरातील सर्व झाडं वाचवायची असतील तर झाडांच्या भोवती असलेले पेव्हिंग ब्लॅाक व काॅक्रीटीकरण रोखलं पाहिजे. एवढच नाहीतर या झाडांच्या मुळात उंदीर, घुशींचा वावर होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. शहरातील सर्व झाडं अशाप्रकारची असून जर सर्व झाडांचा सर्व्हे झाला तर शहरातील निम्मी झाडं कापावी लागतील. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नागरिक रवि गजरे म्हणाले, वृक्ष पडण्याच्या कारणामध्ये प्रामुख्याने फूटपाथ सुशोभीकरणाच्या नावाखाली केले जाणारे सिमेंटचे बांधकाम, पेव्हिंग ब्लॉक, केबल टाकण्यासाठी फूटपाथ खणण्याचे प्रकार, केबल टाकल्यावर खड्डे बुजवण्यात हयगय, शास्त्रोक्तरीत्या झाडांच्या फांद्या कापण्याचे अज्ञान, बिल्डिंग बांधताना इमारतीसमोरील झाडांच्या मुळांना होणारी दुखापत, होर्डींग लॉबी आदी गोष्टी झाडांचा शत्रू आहे. शहरात दर पावसाळ्यात झाडे कोसळतात, त्याबरोबर जिवितहानीही होते. ही झाडे का कोसळतात, ते शोधण्यासाठी कारणांच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. 
 

loading image