खराडी बाह्यवळणावर उड्डाण पूल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

चौकात फक्त दीडशे सायकली !
एकेकाळी पुणे शहराची ओळख ‘सायकलींचे शहर’ म्हणून होती. मात्र महापालिका सायकलींसाठी नवीन ट्रक बांधणे, पब्लिक बायसिकल शेअरिंगसारख्या योजना राबवूनसुद्धा सायकली कमी होताना दिसत आहेत. रस्ता सुरक्षा ऑडिटमध्ये खराडी चौकात दिवसभरात दीडशे सायकलींची नोंद झाली आहे.

येरवडा - नगर रस्त्यावरील खराडी बाह्यवळण येथे दुतर्फा तीनपदरी ग्रेडसेपरेटर; तर येरवडा ते मुंढवा व मुंढवा ते वाघोलीच्या दिशेला जाण्यासाठी उड्डाण पूल असणार आहे. त्यामुळे चौकातील वाहतूक कोंडी कायमची संपणार असून, पुढील चाळीस वर्षांतील संभाव्य वाहनांची संख्या विचारात घेऊन नियोजन केल्याची माहिती आमदार सुनील टिंगरे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नगर रस्त्यावरील बाह्यवळण मार्गावर दिवसाला सरासरी १ लाख चाळीस हजार वाहनांची वर्दळ असते. यामध्ये दुचाकींची संख्या ४५ हजार, मोटारी तीस हजार, रिक्षा चार हजार, बसची संख्या तीन हजार असल्याची माहिती रस्ता सुरक्षा ऑडिटमध्ये नोंदविण्यात आल्याचे सांगत टिंगरे म्हणाले, ‘‘खराडी बाह्यवळण चौकात उड्डाण पूल व ग्रेडसेपरेटर करण्यात येणार आहे. उड्डाण पुलाला १८.५५ कोटी; तर ग्रेडसेपरेटरला २१.३२ कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. सांडपाणी वाहिन्यांस इतर सेवा वाहिन्या टाकण्यासाठी सुमारे ९ कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. महापालिकेने या आर्थिक वर्षात पंधरा कोटी रुपयांची तरतूद केली असून, उर्वरित रक्कम राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मिळविण्यात येणार आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flying bridge over rough terrain