

बारामती - ‘दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणापेक्षाही अजित पवार यांच्या जाण्याने जे संकट उभे ठाकले आहे, त्यातून मार्ग काढणे हे जास्त महत्त्वाचे आहे. जयंत पाटील व अजित पवार काही विषयांवर चर्चा करत होते, यापेक्षा विलीनीकरणाच्या विषयात अधिक काही नाही,’ असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बारामतीत स्पष्ट केले. तसेच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदी संधी देण्यात आली आहे, याचा आपल्याला आनंद आहे, अशी भावना व्यक्त केली.