esakal | लोककलाकारांना ओढ नव्या तंत्रज्ञानाची | Pune
sakal

बोलून बातमी शोधा

लोककलाकारांना ओढ नव्या तंत्रज्ञानाची

लोककलाकारांना ओढ नव्या तंत्रज्ञानाची

sakal_logo
By
जितेंद्र मैड

कोथरुड : युट्यूब, टीकटॉक, इन्स्टाग्राम सारख्या समाज माध्यमामुळे लोकवस्तीतील कलाकार समाजमाध्यमावर स्टार म्हणून मिरवू लागले. त्यातून निर्माण झालेली प्रसिध्दीची ओढ नव्या तंत्रज्ञानाला आत्मसात करण्यासाठी लोककलाकारांना प्रवृत्त करत आहे.

भक्ताचा करतो उध्दार, माझा मार्तंड मल्हार तसेच भावा बहिणीची कथा या गाण्यांना युट्यूबवर मिलियनच्या पुढे व्ह्यूव्हर मिळाल्याने अवघे आठवी शिक्षण झालेल्या सुधीर जाधवचे जीवनच बदलून गेले. सुधीर जाधव म्हणतो, माझ्यासारखे अनेक लोक कलाकार पुण्यात आहेत. गाणे चालतील तसा आमच्या म्युझिक चॅनेलचा आम्हाला अधिक उपयोग होईल. त्यात माझे सत्तर हजाराहून अधिक रुपयांची गुंतवणूक झाली आहे. इतरांना कदाचित ही रक्कम काहीच वाटणार नाही. पण माझ्यासारख्यासाठी ही फार मोठी रक्कम आहे. युट्यूब मधून मला जेव्हा पंधरा हजाराचा चेक मिळाला तो क्षण माझ्यासाठी खुप आनंदाचा होता. आमच्या चॅनेलला हजार सबस्क्राईबर झाल्यावर चार स्टेपचा फॉर्म भरायचा होता. त्याचे मार्गदर्शन विशाल मोहिते यांनी केले. अशा मार्गदर्शनाची आम्हा लोककलाकारांना गरज आहे. पण योग्य मार्गदर्शन करणारा भेटणे हे सुध्दा भाग्य असते.

सुधीर सांगतो की, साजन बेंद्रे, अजय शिरसागर, सोनु साठे हे माझे गुरु बंधु आहेत. रुपेश कांबळे, ऋतिक कांबळे यासारखे लोककवी आम्हाला मार्गदर्शन करतात. मी इतर चॅनेलला गाणे देत होतो. नंतर स्वतःचे चॅनेल नंदीनी गायकवाड यांच्या पाठींब्यावर चालु केला. नंदीनी म्युझिकल चॅनेलची वर्षभरात साठ गाणी झाली आहेत. त्यासाठी मी स्वतः किंवा नंदीनी गाणे रचते. तसेच रुपेश कांबळे आदी कवी आमच्यासाठी लिहितात. पर्वती दर्शन, तळजाई या ठिकाणी आम्ही गाण्याचे शुटींग करतो. माझे गाणे व्हायरल व्हावे ही माझी इच्छा आहे. लोकात नाव व्हावे असे वाटते. गाणी पाहून लोक चौकशी करतात. आता माझे वीस शीष्य झाले आहेत. त्यामुळे गाण्यातच करीयर करण्याची इच्छा आहे.

महामारीच्या काळाबाद्दल बोलताना सुधीर म्हणाला की, कोरोना काळात आम्हा कलाकारांना कोणाचाच आधार भेटला नाही. सरकारने कलाकारांसाठी काही सुविधा द्यायला हव्यात. मी गातो पण त्यात मला फारसे उत्पन्न मिळत नाही. जगावेगळे काहीतरी घडावे अशी अपेक्षा आहे. नवीन तंत्रज्ञान शिकावे असे वाटते पण त्यात मार्गदर्शन करणारे कोणी मिळत नाही. नामांकिंत लोकांकडून शिकावे वाटते. पुण्यात लोककलांच्या शिक्षणाची संधी देईल अशी शिक्षण संस्था आहे का याचीच आम्हाला माहिती नाही.

नंदीनी कांबळे यांनी सुधीरच्या सहकार्याने म्युझिक चॅनेल युट्युबवर सुरु केला. त्यांना श्रोत्यांकडून अपेक्षा आहेत. त्या म्हणाल्या, आमच्या चॅनेलला लोकांची साथ मिळणे हेच आमचे यश आहे. आमच्या सादरीकरणात, गायनात चुक झाली तर लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देवून कळवले तर आमच्यात सुधारणा करता येईल. लोककलाकारांना लोकांची साथ हवी आहे.

loading image
go to top