रेमडेसिविरच्या बाबतीत टास्क फोर्सच्या निर्देशांचे पालन करा : जिल्हाधिकारी

डॉक्टरांनीही राज्यसरकारच्या निर्देशानुसारच इंजेक्शनचा वापर करणे अपेक्षित
case of remdesivir
case of remdesivirSakal Media

बारामती : राज्य शासनाच्या टास्क फोर्सने जे निर्देश दिलेले आहे त्यांचेच पालन डॉक्टरांनी करावे, रेमडेसिविरच्या बाबतीत टास्क फोर्सच्या सूचनांचे पालन व्हायला हवे, जेणेकरुन या इंजेक्शनबाबतीत सुरु असलेली टंचाईची स्थिती कमी होऊ शकेल, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज बारामतीत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीतील कोरोना बाबतच्या स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर अजित पवार यांच्याच सूचनेवरुन जिल्हाधिका-यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी हे आवाहन केले.

case of remdesivir
कौतुकच आहे भावाचं!आयटीयन तरुणाने घेतलयं 30 Days Challenge

रेमडेसिविर इंजेक्शनबाबत जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष केलेला असून ज्या रुग्णालयांना थेट इंजेक्शन दिले जात असून रुग्णालयातील डॉक्टरांवर जबाबदारी निश्चित केलेली आहे. डॉक्टरांनीही राज्य शासनाच्या निर्देशानुसारच इंजेक्शनचा वापर करणे अपेक्षित आहे. आज रुग्णच या इंजेक्शनची मागणी करु लागले आहे, हे चुकीचे आहे, डॉक्टरांनी या बाबतचा निर्णय घेणे अपेक्षित आहे. जिल्हा परिषदेकडून वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित 1500 हून जास्त पदांच्या थेट मुलाखती आयोजित केल्या होत्या, या पैकी 900 हून अधिक लोकांना थेट कामावर रुजू होण्याचे आदेश दिलेले आहेत, काही पदे भरण्यासाठी उपविभागीय अधिका-यांना अधिकार दिलेले आहेत, यावर सातत्याने काम सुरु आहे. जसजसे मनुष्यबळ उपलब्ध होईल तशा नियुक्त्या करुन आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देऊ, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

case of remdesivir
विद्यार्थ्यांनी धरला घरचा रस्ता

गेल्या पंधरवड्यात जिल्ह्याला दिवसाला 75 मेट्रीक टन ऑक्सिजन लागत होता, आज हेच प्रमाण 321 मे.टन. इतके झाले आहे, जिल्ह्यातील तीन ऑक्सिजन उत्पादक कंपन्या व 16 रिफिलर्स यांचे शंभर टक्के उत्पादन वैद्यकीय क्षेत्रासाठी राखीव केलेले आहे.

इंजेक्शनचा तुटवडा ही वस्तुस्थिती-रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे ही वस्तुस्थिती आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मान्य केली. आज स्टॉकिस्ट व रुग्णालयांकडून 42 हजार इंजेक्शनची मागणी आहे, गेल्या तीन दिवसात 12 हजार इंजेक्शनचा पुरवठा रुग्णालयांना करण्यात आला आहे. रुग्णालयात दाखल प्रत्येक रुग्णाला इंजेक्शनची बारामतीतही मागणी मी पाहिली, त्याची बिलकूल गरज नाही. डॉक्टरांनीही याचा वापर टास्क फोर्सच्या निर्देशानुसारच करावा -डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com