कौतुकच आहे भावाचं!आयटीयन तरुणाने घेतलयं 30 Days Challenge

आयटी कंपनीतील २५ वर्षीय विवेक गुरवचा पुढाकार; कचऱ्यापासून ‘इकोब्रिक’
the 30 Days Challenge taken by 25 year IT workers for Awareness on Plastic Pollution
the 30 Days Challenge taken by 25 year IT workers for Awareness on Plastic PollutionTeam Esakal

पुणे : प्लॅस्टिकचा वापर दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे पर्यावरणात प्लॅस्टिक प्रदूषणाचा विषय गंभीर झाला आहे. त्यामुळे प्लॅस्टिक प्रदूषण एक जागतिक समस्या बनली आहे. प्लॅस्टिक प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी २५ वर्षीय विवेक गुरव या तरुणाने पुढाकार घेतला आहे. ‘३० डेज चॅलेंज’ या अनोख्या उपक्रमातून तो नागरिकांमध्ये प्लॅस्टिक प्रदूषणाबाबत जनजागृती करत आहे. आयटी कंपनीत काम करणारा विवेक गेल्या दोन वर्षांपासून शहरात प्लॅस्टिकच्या कचऱ्यावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. यामध्ये प्लॉगिंग ड्राईव्ह, प्लास्टिक कचऱ्यापासून ‘इकोब्रिक’ तयार करणे अशा विविध गोष्टींचा त्यात समावेश आहे.

याबाबत विवेक म्हणाला, ‘‘दररोज जॉगिंगला जात असताना ठिकठिकाणी प्लॅस्टिकचा कचरा आढळून येत होता. प्लॅस्टिक हा पर्यावरणात वर्षानुवर्षे तसाच राहतो. तसेच याचे विघटन करणे आव्हानात्मक असल्यामुळे आपण काही तरी करायला हवे, असा विचार मनात आला. त्यावेळी ‘३० डेज चॅलेंज’ची कल्पना सुचली. सध्या कोरोनामुळे प्लॅस्टिकच्या वापरातही वाढ झाली आहे. या उपक्रमादरम्यान दररोज सकाळी अर्धा तास तीन किलोमीटरच्या परिसरात असलेल्या प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन करण्यास सुरू केले. यामध्ये प्लॅस्टिक बरोबर, काचेच्या बाटल्या, सिगारेटची थोटके सुद्धा गोळा करण्यात आली. त्यामुळे आपल्या परिसरात कशा प्रकारचा कचरा सर्वाधिक आढळतो हे समजले. यामध्ये इतर नागरिकांनी सुद्धा सहभाग घेण्यास सुरवात केली. नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरात देखील नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. केवळ राज्यातच नाही तर दक्षिण भारतातील कोइमतूर, पुद्दुचेरी, मदुराई, रामेश्‍वरम, कन्याकुमारी आणि बंगळूर या शहरांमध्ये सुद्धा हा उपक्रम राबविण्यात आला.’’

उपक्रमाबाबत

  • या उपक्रमाअंतर्गत सुमारे १५० किलो प्लॅस्टिकचे संकलन

  • राज्यासह दक्षिण भारतातील विविध शहरांमध्ये उपक्रम राबविण्यात आले

  • दररोज पाच ते सहा किलो प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन

  • संकलित करण्यात आलेल्या प्लॅस्टिकचे वर्गीकरण करून पुर्नप्रक्रिया करण्यात आली

  • ‘इकोब्रिक्स’ व इतर सजावटीच्या वस्तू तयार करण्यात आल्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com