

सावधान! तुमच्या पिझ्झा-बर्गरमधील ‘चीज’ खरे की भेसळयुक्त?; ‘चीज ॲनॉलॉग’ वापरणाऱ्या हॉटेल्सवर आता FDA ची करडी नजर!
Sakal
पुणे : रेस्टॉरंट, हॉटेल, केटरर्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांकडून अन्नपदार्थ तयार करताना दुधापासून तयार केलेले अस्सल ‘चीज’ नसून ते दुधाऐवजी वनस्पती व इतर घटकांपासून तयार होते. त्याला ‘चीज ॲनालॉग’ असे म्हणतात. परंतू, त्याची मुळ ‘चीज’ म्हणून विक्री केली जात असून त्याऐवजी ‘चीज ॲनालॉग’ असा करावा, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अन्न विक्रेत्यांना दिले आहेत.