RTPCR test
RTPCR test

मंचरमध्ये ॲलर्ट घोषित ; बाहेरून येणाऱ्यांना आरटीपीसीआर बंधनकारक

Published on

मंचर : येथे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गाव ॲलर्ट म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने इतर गावच्या नागरिकांना शहरात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल दाखविणे बंधनकारक केले आहे, अशी माहिती सरपंच किरण राजगुरू व उपसरपंच युवराज बाणखेले यांनी दिली.

RTPCR test
अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच आजीबाईंनी उघडले डोळे

मंचर (ता. आंबेगाव) येथे लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटातील अनेक व्यक्ती दूरवरच्या भागातून येत आहेत. त्यांच्यापासूनही कोरोना संसर्ग होण्याची भीती ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केली. त्यामुळे लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच कसून चौकशी केली जाणार आहे. ४८ तासांतील आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल आवश्यक आहे.

RTPCR test
पुण्यात माणुसकीला काळीमा! बिलासाठी चिमुकल्याचा मृतदेह 4 दिवस रुग्णालयातच

अहवाल नसल्यास क्वारंटाइन केले जाईल. त्याचा खर्च सदर नागरिकांना स्वतः करावा लागणार आहे. संबंधितांच्या हातावर क्वारंटाइनचे शिक्के मारण्यात येणार आहेत, असे ग्रामपंचायत सदस्य अरुण बाणखेले व ज्योती निघोट यांनी सांगितले. मंचर ग्रामपंचायतीच्या हद्दीत आतापर्यंत दोन हजार ६७६ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. १२० जण उपचार घेत आहेत. ३९ जणांचा मृत्यू झाला आहे, असे ग्रामविकास अधिकारी के. डी. भोजने यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com