
हडपसर : गोंधळ परंपरेचा अविभाज्य भाग असलेले संबळ हे तालवाद्य आता हडपसरमध्ये प्रथमच ढोलताशा पथकात ताल धरणार असून येथील रुद्रतेज ढोल ताशा पथकामध्ये यावर्षीपासून त्याचा आवाज घुमणार आहे. पथकाने जेजुरी गडावर नुकतेच श्री मार्तंड देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांच्या हस्ते संबळचे पूजन करून सामुहिक वादन केले.