नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलेवर बळजबरीने बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

नोकरी देण्याचे आमिष दाखवून बळजबरीने बलात्कार केल्याप्रकरणी हॉटेल मालक, त्याची पत्नी व मुलाविरूध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलेवर बळजबरीने बलात्कार

कुरकुंभ - हवेली तालुक्यातील एका 26 वर्षीय महिलेला दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील एका हॉटेल मालकाने नोकरी देण्याचे आमिष दाखवून बळजबरीने बलात्कार करून, याबाबत कोणाला सांगितल्यास तुझे अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि जीवे मारून उजनी धरणात टाकून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी हॉटेल मालक त्याची पत्नी व मुलाविरूध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ऊरूळी कांचन (ता. हवेली) परिसरातील पिढीत महिलेला स्टेशनवर भेटल्यानंतर कुरकुंभ येथील हॉटेल कुबेरचे मालक प्रवीण ठकुरे याने तु काय काम करते, तुझ्या घरात कोणकोण आहेत असे प्रश्न विचारले. त्यावेळी पिढीत महिलेने मी एकटीच असल्याचे सांगितले. त्यावर ठकुरे याने तु माझ्या मुलीसारखी असून माझ्या हॉटेलमध्ये मॅनेजरचे काम देतो. खाणे, राहण्याची व्यवस्था करून 20 हजार रूपये पगार देतो. असे सांगून मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर दोघांचे मोबाईलवरती संभाषण होऊन पिढीत महिला कुरकुंभ येथे कामाला आली. त्यानंतर हॉटेल मालकाने पिढीत महिलेला 21 मार्च 2022 रात्री कुबेर हॉटेलमध्ये आणून आराम करण्यास सांगितले. सर्दी झाल्याने ठकुरे यांनी पिढीतेला लिंबू सरबत कोल्ड्रीग्स दिले. ते पिल्यानंतर कोल्ड्रीग्स घेतल्यानंतर मी झोपी गेले. त्यानंतर पिढीतेला दुसर्‍यादिवशी 22 मार्चला दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जाग आली. त्यावेळी बलात्कार झाल्याचे पिढीतेच्या लक्षात आले. तेव्हा आरडाओरडा केली.

त्यानंतर प्रवीण ठकुरे हॉटेलवर येऊन अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तो पुन्हा रात्री दारू पिऊन येऊन शरीर संबंध ठेवणार होता. पण शरीर संबंध मी नकार दिला. तर मारहाण करून बळजबरीने संभोग केला. दुसऱ्यादिवशी जाग आली. तर पिढीता नवी पेठ पुणे येथे असल्याचे लक्षात आले. त्याठिकाणी प्रवीण ठकुरे, त्यांची पत्नी प्रगती व मुलगा प्रथमेश होता. त्यांनी तु झालेला प्रकार कुणाला सांगितल्यास जिवे मारून उजनी धरणात फेकून देण्याची धमकी दिली. त्यांच्यापासून पुण्यातून निसटून भितीपोटी पिढीत महिला मुंबई येथे गेली. जिवे मारण्याच्या भितीने पोलिस स्टेशन तक्रार केली नाही. मात्र, प्रवीण ठकुरे याने आणखी एका महिलेला औषध देवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दौंड पोलीसात गुन्हा दाखल होऊन अटक झाल्याचे समजल्यानंतर पिढीत महिलेने 28 सप्टेंबर 2022 रोजी दौंड पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी प्रवीण ठकुरे, त्यांची पत्नी प्रगती ठकुरे, मुलगा प्रथमेश यांच्याविरूध भारतीय दंड संहिता कलम 376, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राठोड करीत आहेत.