कोयत्याचा धाक दाखवून २ लाख ८२ हजार रुपये मुद्देमालाची जबरी चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 crime news

चोरट्यांनी रात्री घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम व सोन्याचे दागिन्यांसह सुमारे २ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली.

कोयत्याचा धाक दाखवून २ लाख ८२ हजार रुपये मुद्देमालाची जबरी चोरी

तळेगाव ढमढेरे - कोंढापुरी ( ता. शिरूर) कवठीमळा येथे ३ अनोळखी चोरट्यांनी रात्री घरात घुसून व कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम व सोन्याचे दागिन्यांसह सुमारे २ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करून जबरी चोरी केल्याची घटना सोमवारी रात्री अडीच वाजता घडली आहे. यासंदर्भात संतोष उत्तरेश्वर जगताप (वय ३७) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. या संदर्भात पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितलेली माहिती अशी:

कोंढापुरी येथील कवठीमळ्यातील संतोष जगताप यांच्या राहत्या घराचा दरवाजा जोराचा धक्का देऊन उघडून तीन अनोळखी इसम घरात घुसले. श्री जगताप व त्यांच्या पत्नीला कोयत्याचा धाक दाखवून पत्नीच्या अंगावरील सोने काढून देण्याची चोरांनी धमकी दिली. त्यापैकी एक अनोळखी इसम हिंदी मध्ये बोलला की, "पैसा, सोना, अंगठी किधर किधर रखा ओ बताओ". त्यावेळी पत्नीने हाताने लोखंडी कपाट दाखवून त्यांना कपाटातील सोने कोठे ठेवले आहे ते सांगितले. त्यानंतर त्यांनी कपाटातील कपडे काढून बाहेर फेकून देऊन कपाटातील सोन्याचा गंठण, दोन्ही कानातील कर्णफुले, दोन्ही लहान मुलांचे सोन्याचे दागिने व कपाटातील ५० हजार रुपये रोख रक्कम काढून घेऊन दोघांचे मोबाईल घेऊन ते घरातून बाहेर निघून गेले. मात्र बाहेर जाताना चोरांनी घराचा दरवाजा बाहेरून बंद केला.

दरम्यान, चोरांनी शेजारील दुसऱ्या खोलीतील श्री जगताप यांचे मेहुणे गणेश महादेव घरत यांच्या घराचा दरवाजा तोडून व त्यांना कोत्त्याचा धाक दाखवून घरातील कपाट उघडून कपाटातील सोन्याची अंगठी, सोन्याचे कर्णफुलांचा जोड, सोन्याचे वेल व रोख १० हजार रुपये अनोळखी चोरांनी चोरी करून नेले आहेत.

शिक्रापूर पोलिसांनी चोरीची गंभीर दखल घेतली असून तीन अनोळखी चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.

तीन अज्ञात चोरांनी जबरी चोरी केल्याने कोंढापुरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Forcible Theft Of 2 Lakh 82 Thousand Rupees Subject Goods By Showing Fear Of Koyata Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..