परदेशी विद्यार्थ्यांना पुण्यात येण्याची लागली ओढ

ब्रिजमोहन पाटील 
Thursday, 1 October 2020

'कोरोना'मुळे पुण्यात शिक्षणासाठी विद्यार्थी येणार का ? असा प्रश्‍न संस्थाचालक, प्राध्यापक यांना पडलेला असतानाच परदेशी विद्यार्थ्यांना पुण्यात येण्याची ओढ लागलेली आहे. 2020-21 या वर्षासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह संलग्न महाविद्यालयांमध्ये 600 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून, ती पूर्ण झाल्यानंतर त्यांना ऑनलाइन शिक्षण सुरू केले जाणार आहे.

पुणे - 'कोरोना'मुळे पुण्यात शिक्षणासाठी विद्यार्थी येणार का ? असा प्रश्‍न संस्थाचालक, प्राध्यापक यांना पडलेला असतानाच परदेशी विद्यार्थ्यांना पुण्यात येण्याची ओढ लागलेली आहे. 2020-21 या वर्षासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह संलग्न महाविद्यालयांमध्ये 600 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून, ती पूर्ण झाल्यानंतर त्यांना ऑनलाइन शिक्षण सुरू केले जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिक्षणाचा माहेरघर असलेल्या पुण्यात उच्च शिक्षणासाठी येण्याची ओढ विद्यार्थ्यांना कायम असतेच. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापासून ते प्रत्येक राज्यातील विद्याथ्यांमध्ये पुणे विद्यापीठासह शहरातील नामांकित महाविद्यालये, अभिमत व खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी चढाओढ लागलेली असते. ज्यांना गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश मिळत नाही असे विद्यार्थी व्यवस्थापन कोट्यातून अतिरिक्त शुल्क मोजून प्रवेश घेण्यासाठी तयार असतात. पुण्यात2019-20 या वर्षामध्ये 70 देशातील 338 विद्यार्थी आणि 231 विद्यार्थिनी असे एकूण 569 जणांनी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला होता.

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अंतिम वर्षाच्या परीक्षेची तयारी सुरू असताना कर्मचाऱ्यांनी काम बंद पाडले

मार्च महिन्यापासून कोरोनामुळे सर्व महाविद्यालये बंद आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. लॉकडाऊन काळात घरी न जाऊ शकलेली व विद्यापीठात शिकणारी सुमारे 120 विद्यार्थी वसतिगृहात रहात आहेत, त्यांच्यापैकी जवळपास 40 जण अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. एकीकडे अशी स्थिती असताना पुणे विद्यापीठाने 2020-21 या वर्षातील प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यास अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आहे.

पुण्याच्या आरोग्य प्रमुखपदी डॉ. आशिष भारती यांची नियुक्ती

पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे प्रमुख डॉ. विजय खरे म्हणाले, 'पुणे विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी परदेशी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. यंदा सुमारे 40 देशातील 600 जणांचे प्रवेश होण्याची शक्‍यता आहे. ऑक्‍टोबर अखेरीस पर्यंत या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण होऊन, नोव्हेंबर मध्ये त्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू होण्याची शक्‍यता आहे.

'गतवर्षी प्रमाणेही यंदाही परदेशी विद्यार्थ्यांनी स. प. महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अर्ज केले असून, प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाची स्थिती पाहता आढावा घेऊन पुढील निर्णय होतील.''
- डॉ. दिलीप सेठ, प्राचार्य, स. प. महाविद्यालय.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Foreign students started coming to Pune