
पुणे - मुंबई – बेंगळुरू महामार्गावरून बसमधून प्रवास करणाऱ्या परदेशी महिला प्रवासाकडून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पुणे विभागाने तब्बल साडेसात कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला आहे. ही महिला दिल्लीहून बेंगळुरूला बसने प्रवास करत होती. परदेशी महिलेला अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे.