पुण्यात परदेशी महिलेने मागितली लिफ्ट मग बलात्कार अऩ्...

A Foreign women raped by a Two who gave her lift at Lohgaon in pune
A Foreign women raped by a Two who gave her lift at Lohgaon in pune

पुणे : हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर घरी जाण्यासाठी लिफ्ट मागणाऱ्या परदेशी महिलेला दोघांनी निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना लोहगाव व धानोरीजवळील परिसरामध्ये सोमवारी मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ख्रिसमसच्या दिवशीच होणार पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांची गैरसोय; 'या' गाड्या उद्या रद्द

याप्रकरणी एका 26 वर्षीय महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या परदेशी नागरीक असून त्या साडी एक्‍सपोर्टचा व्यवसाय करतात. त्या ऑगस्ट महिन्यात प्रवासी व्हिसावर भारतात आल्या होत्या. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता त्या मुंढव्यातील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आल्या होत्या. जेवण झाल्यानंतर मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास हॉटेलमधून बाहेर पडल्या.

पुणे-मुंबई मार्गाने उद्या प्रवास करणार आहात? मग ही बातमी वाचा

कोंढवा येथील त्यांच्या घरी जाण्यासाठी त्या कारची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यांनी एका ऍपद्वारे कार मागविली होती. संबंधीत कार चालकाशी त्यांनी संपर्क साधला. त्याचवेळी पांढऱ्या रंगाच्या मोपेड दुचाकीवरुन एकजण तेथे आला. त्याने इंग्रजीमधून फिर्यादींशी संपर्क साधून त्यांना घरी सोडण्याची बतावणी केली. त्यावर विश्‍वास ठेवून महिला त्याच्यासमवेत दुचाकीवरुन घरी जात होती. त्याचवेळी दुचाकीस्वाराने त्याच्या मित्राशी मोबाईलवरुन संपर्क साधून त्याला बोलावून घेतले. त्यानंतर तिघेजण दुचाकीवरुन जात असताना दुचाकी वेगळ्याच मार्गाने जात असल्याचा महिलेला संशय आला. तिने त्याबाबत त्यांच्याकडे विचारणा करुन दुचाकी थांबविण्यास सांगितली. त्यानंतर त्यांनी विमानतळ ते लोहगाव रस्त्यावरील निर्जनस्थळावर तिला नेले. त्यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने त्यांना तिला मुख्य रस्त्यावर सोडण्यास सांगितले. तिघेजण दुचाकीवरुन जात असताना त्यांची गाडी घसरून तिघेजण खाली पडले. त्यावेळी महिलेने आरडाओरडा करुन स्थानिक नागरिकांकडे मदत मागितले. त्यावेळी समोरील सोसायटीमध्ये असणाऱ्या तरुणांनी तेथे धाव घेतली. तोपर्यंत आरोपींनी दुचाकीवरून तेथून पळ काढला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 

महिलेने तरुणांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पहाटे साडे चार वाजता महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासणी करण्यात येत असून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सुचना दिल्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com