Forest Department : वन विभाग आर्थिक सक्षम होणार : वनमंत्री गणेश नाईक

Ganesh Naik : पुण्यातील कार्यशाळेत वन विभाग आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले.
Forest Department
Forest DepartmentSakal
Updated on

पुणे : ‘‘वन विभागच आर्थिक सक्षम होऊन राज्य सरकारला पैसे देऊ शकेल. त्या दृष्टीने येत्या चार वर्षांत क्षमता निर्माण केली जाणार,’’ असा विश्‍वास राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. ‘वन विभाग’, ‘डीईएस पुणे विद्यापीठ’ आणि ‘वनवासी कल्याण आश्रम’ यांच्यातर्फे आयोजित ‘लोकसहभागातून वन संवर्धन आणि पर्यावरणपूरक उपजीविका’ या दोन दिवसांच्या कार्यशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी देवगिरी कल्याण आश्रमाचे चेत्राम पवार, डीईएस पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, विश्‍वस्त अनंत जोशी, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन कुलकर्णी, वनवासी कल्याण आश्रमाचे गिरीश कुबेर उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com