बारामती तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

राजकुमार थोरात, मिलिंद संगई
Thursday, 30 January 2020

बारामती तालुक्यातील कण्हेरी येथील एका शेतात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आज बिबट्या जेरबंद झाला. या बिबट्याला बारामती येथे हलविण्यात येत असून वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती वनसंरक्षक जराड यांनी दिली .

बारामती, वालचंदनगर : बारामती तालुक्यामध्ये धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यामध्ये वनविभाग व रेस्क्यू पथकाला यश आले असून, आज (गुरुवार) पहाटे बिबट्या कन्हेरी परीसरामध्ये पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१० डिसेंबर २०१९ राेजी बिबट्या बारामतीमधील एम.आय.डी.सी कंपनीमध्ये घुसला होता. यानंतर बारामती व इंदापूर तालुक्याच्या परीसरामध्ये बिबट्या वावर होते.गेल्या बारा-तेरा दिवसापासून बिबट्याने काटेवाडी व कन्हेरी परीसरामध्ये धुमाकूळ घालून मेंढ्या व शेळ्यांच्या कळपावर हल्ला करुन शेळ्यांना पळवून नेले होते. तसेच दिवसा लोकवस्तीमध्ये येण्यास बिबट्याने सुरवात केल्यामुळे नागरिक धास्तावले होते.

बारामती तालुक्यातील कण्हेरी येथील एका शेतात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आज बिबट्या जेरबंद झाला. या बिबट्याला बारामती येथे हलविण्यात येत असून वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती वनसंरक्षक जराड यांनी दिली .

वनविभाग व रेस्क्यू पथक गेल्या आठ दिवसापासून काटेवाडी व कन्हेरी परीसरामध्ये ठाण मांडून बसले होते. बिबट्याला पकडण्यासाठी सहा ट्रॅप कॅमेरे व तीन पिंजरे लावण्यात आले होते.आज गुरुवारी (ता.३०) रोजी पहाटेच्या वेळी कन्हेरी गावातील संतोष जाधव यांच्या शेेतामध्ये लावलेल्या पिजंऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: forest department captured leopard in Baramati area