shahajibapu patil and pandurang shinde
sakal
इंदापूर - भाजपच्या ओबीसी सेलचे माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केल्याने इंदापूर तालुक्यात भाजपला दोन दिवसांत दुसरा राजकीय धक्का बसला आहे. यापूर्वी भाजपचे मयूर पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यापाठोपाठ शिंदे यांनी शिवसेनेची वाट धरल्याने तालुक्यात राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत इंदापुरात त्यांनी ही घोषणा केली.