Ravindra Dhangekar : धंगेकरांचा काँग्रेसला धक्का, शिवसेनेत करणार प्रवेश; म्हणाले, भरपूर मिळालं पण सत्ता...

Ravindra Dhangekar : काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसला रामराम करत असल्याचं सांगितलं आणि शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती दिली.
Ravindra Dhangekar :  धंगेकरांचा काँग्रेसला धक्का, शिवसेनेत करणार प्रवेश; म्हणाले, भरपूर मिळालं पण सत्ता...
Updated on

पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम केलाय. मुंबईत आज ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पक्ष सोडताना आपल्याला दु:ख होत आहे. सत्ता असल्याशिवाय काम होत नाहीत असंही रविंद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. रविंद्र धंगेकर मुंबईत आज सायंकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत. कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण हा निर्णय घेतला असल्याचंही धंगेकर यांनी सांगितलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com