Vidhan Sabha 2019 : पुण्याच्या माजी उपमहापौरांसह 10 स्थानिक नेत्यांचा भाजपात प्रवेश

Former Deputy Mayor of Pune and 10 local leaders joins BJP
Former Deputy Mayor of Pune and 10 local leaders joins BJP

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर व नगरसेवकांनी खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हे सर्वजण कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील असल्याने या मतदार संघात भाजपची ताकद आणखी वाढल्याने भाजपाच्या विजयाचा मार्ग सुखकर झाल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचारासाठी आले असता नेतृत्वाखाली या ताकदवर स्थानिक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी शिवाजीनगर मतदार संघातील भाजपाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे व पुणे शहर भाजपाचे सरचिटणीस गणेश बिडकर उपस्थित होते. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी आमदार चंद्रकांत छाजेड यांचे सुपूत्र आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे, लहु बालवडकर, समाधान शिंदे, तुकाराम जाधव, सुरेश कांबळे, कमलेश चासकर, अभय सावंत व दुर्योधन भापकर यांचा समावेश आहे. या प्रत्येक नेत्यांच्या मागे त्यांची हक्काची मते आहेत. त्यामुळे पुण्यातील कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील भाजपाची ताकद आता आणखी वाढली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राला वेगळी दिशा दिली आहे. विकासाचे राजकारण करताना महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. दूरदृष्टीकोन ठेवून महाराष्ट्राच्या विकासाची धोरणे आखली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊन सामाजिक समतोल साधण्यात फडणवीस यशस्वी ठरले. शेतीला पाणी मिळावे म्हणून जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविली.

मुंबई, पुणे व नागपूर शहरांत मेट्रोचं जाळं अधिक वेगानं निर्माण केले. आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीसांच्या आश्वासन नेतृत्वाला स्वीकारून पुणे महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंटमधील आजी-माजी उपमहापौर व नगरसेवक आणि नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोंन्मेंट विधानसभा मतदार संघातील या नेत्यांच्या भाजप प्रवेशाने आता सर्व राजकीय गणिते बदलली असून त्याचा परिणाम निवडणूक निकालात नक्कीच पाहायला मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com