Pune Crime : बेहिशेबी मालमत्ता जमविलेल्या तत्कालीन जीएसटी अधीक्षकाला सक्तमजुरी; गुन्ह्यात मदत केल्याने पत्नीही दोषी

सरकारी पदाचा गैरवापर करून बेकायदा पद्धतीने मालमत्ता जमविली.
Court

Court

sakal

Updated on

पुणे - सरकारी पदाचा गैरवापर करून बेकायदा पद्धतीने मालमत्ता जमविल्याप्रकरणी केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या तत्कालीन अधीक्षकास येथील विशेष सीबीआय न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरी आणि साडेतीन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. गुन्ह्यात मदत केल्याप्रकरणी आरोपीच्या पत्नीला देखील न्यायालयाने दोषी ठरवून तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com