anantrao thopte
sakal
भोर - राज्याचे माजी मंत्री आणि कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे (वय ९३) यांचे गुरुवारी (ता. ४) सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या मागे पुत्र व माजी आमदार संग्राम थोपटे, स्नुषा व जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा थोपटे, दोन विवाहीत मुली व नातवंडे असा परिवार आहे.