'बारा वर्षांपूर्वी मी जात्यात होतो, तीच मूठ आता खडसे यांच्यावर' 

सागर आव्हाड 
Thursday, 22 October 2020

बहुजन नेत्यांवर भाजप अन्याय करत असल्याचं आता उघड झालं आहे. भविष्यात अनेक बहुजन नेते भाजप सोडतील असे भाकीतही शेंडगे यांनी केले आहे.

पुणे : ''नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 12 वर्षांपूर्वी ही वेळ माझ्यावर आली होती. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं, आज मी जात्यात आहे. पुढची मुठ जात्यात तुमची असेल. ती वेळ आता खडसे यांच्यावर आज आली असून, अनेक बहुजन नेत्यांवर भाजपने अन्याय केला आहेे.'' अशी खरमरीत टीका माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजप वाढविण्यासाठी तळागाळात आम्ही काम केलं. तेव्हा भाजपने ही माझं तिकीट कापलं होतं. तीच वेळ एकनाथ खडसे यांच्यावर भाजपने आणली. त्यांचंही तिकीट भाजपने कापलं असल्याचं सांगत भाजपवर शेंडगे यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले असा अन्याय होत असेल तर अनेक बहुजन नेते भाजप सोडतील. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ते पुढे म्हणाले, ''मी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी केली होती, म्हणून मला पक्ष सोडण्यास भाग पाडले. आता एकनाथ खडसेंवरही तीच वेळ आणली आहे.  नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत मी काम केले. मुंडेंसोबत ओबीसी समाजाचे अनेक नेते होते. एकनाथ खडसे हेसुद्धा त्यापैकीच एक आहेत. गोपीनाथ मुंडेंचा जेव्हा अपघात झाला; तेव्हा त्यांच्या मृत्यूची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी, अशी मागणी मी केली होती. माझ्या या मागणीमुळेच मला पक्ष सोडावा लागला. तसेच माझं तिकीट कापण्यात आलं. आता तीच वेळ एकनाथ खडसेंवर आली आहे.'' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बहुजन नेत्यांवर भाजप अन्याय करत असल्याचं आता उघड झालं आहे. भविष्यात अनेक बहुजन नेते भाजप सोडतील असे भाकीतही शेंडगे यांनी केले आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Prakash Shendge criticizes BJP