पुणे : माजी खासदार किरीट सोमय्यांची आयकर सदनला भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit-Somaiya

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज सॅलिसबरी पार्क बोधी टॉवर येथील आयकर सदन येथे भेट दिली.

पुणे : माजी खासदार किरीट सोमय्यांची आयकर सदनला भेट

महर्षी नगर - माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज सॅलिसबरी पार्क बोधी टॉवर येथील आयकर सदन (Income Tax House) येथे भेट दिली. बोधी टॉवर बाहेर असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. नेहरू मार्ग, सॅलिसबरी पार्क मार्गावर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.

सोमय्या आत असतानाच राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन घोषणाबाजी करत आयकर सदन गेट च्या आत मध्ये जाण्याचा प्रयत्न केला. केंद्रातिला भाजप सरकारचा निषेध, किरीट सोमय्या हाय हाय घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला, पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून १) दिनेश खराडे ( माहिती अधिकार सेल पुणे शहर अध्यक्ष) २) अर्जुन गांजे ( कॅन्टोमेंट विधानसभा माजी अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग) असे दोन्ही कार्यकर्त्यांचे आहे.

सोमय्या बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले हसन मुश्रीफ परिवाराकडे शंभर कोटी पेक्षा जास्त बेनामी संपत्ती आहे, त्याची आज न्यायालयीन सुनावणी आहे. घोटाळेबाजांना ठाकरे सरकार पाठीशी घालतय. तसेच सोमय्या यांनी अनिल परब व सरकारच्या विरोधात हल्लाबोल केला. हसन मुश्रीफ यांच्या वर फौजदारी कारवाई मागणी केली. तसेच त्यांनी आपल्याकडे अनेक पुरावे पूरावे असल्याचा दावा केला.

यावेळी माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले, डॉ भरत वैरागे, पूना मर्चंट चेंबर माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले, गणेश शेरला, निखिल शिळीमकर, राजेंद्र सरदेशपांडे, रमेश बिबवे, मनोज कांबळे, सिद्धप्पा नाटेकर यांच्या सह भाजप चे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Former Mp Kirit Somaiya Visits Income Tax House In Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top