पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेशचंद्र ढमाले यांचे निधन

बेलावडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात झाली
Former president of Pune Zilla Parishad Rameshchandra Dhamale passed away
Former president of Pune Zilla Parishad Rameshchandra Dhamale passed away

पौड - बेलावडे (ता. मुळशी) येथील पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेशचंद्र शंकरराव ढमाले (वय 82) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

मुळशी पंचायत समितीचे करड्या शिस्तीचे प्रथम सभापती शंकरराव ढमाले यांचा आदर्श समोर ठेवून रमेशचंद्र ढमाले यांनी कॉंग्रेसमध्येच एकनिष्ठ राहत काम केले. बेलावडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात झाली. 1986 ते 1992 या काळात त्यानी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. त्यापूर्वी ते कृषी सभापती होते. त्याचप्रमाणे सलग 28 वर्षे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतही संचालक त्यांनी काम पाहीले. एक वर्षे बॅंकेचे ते उपाध्यक्ष होते. मुळशी पंचायत समितीती उपसभापती म्हणून त्यांनी काम पाहीले. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे पाच वर्षे ते संचालक होते. शेतीला जोडधंदा म्हणून फलोत्पादन करण्याचे आप्पासाहेबांचे काम त्यांनी पुढे चालू ठेवले होते. पुणे जिल्ह्याच्या राजकारणात तब्बल चार दशके माजी खासदार विदूरा नवले, अशोक मोहोळ यांच्यासमवेत रमेशचंद्र ढमाले यांनी पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्याचा एक दबदबा निर्माण केला होता.

तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील खे़डूतांच्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी यासाठी स्थापन झालेल्या मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाचे ते अध्यक्ष होते. इंग्लडस्थित अनिवासी भारतीय असलेल्या विजय साळवी या नातेवाईकाच्या माध्यमातून त्यांनी जर्मन, इंग्ल़ड, आयर्लंड, तुर्कस्थान या देशातील दानशूरांकडून माले, खेचरे आणि वांद्रे येथील विद्यालयाच्या भौतिक सुविधांसाठी लाखो रूपयांची मदत मिळविली. मुळशी तालुक्यात ते आबासाहेब या नावाने परिचित होते. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक धैर्यशील ढमाले, बेलावड्य़ाचे माजी सरपंच सत्यशील ढमाले हे पुत्र होत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com