पुणे जिल्ह्यातील या दिग्गज नेत्यालाही कोरोनाने घेरले...

pradip kand.
pradip kand.

केसनंद (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष  प्रदिप कंद यांची कोरोनाची टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे. याबाबत त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून याबाबात माहिती दिली आहे. सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढतच असून, रुग्णालयात जागेअभावी ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे, ही बाब गांभीर्याने घेऊन सर्वांनीच योग्य काळजी घेत कटाक्षाने घरातच राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

लॉकडाउनच्या काळात मदत कार्यादरम्यान कोरोनाबाधित झाल्याने काल प्रदिप कंद यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट टाकत मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या अचानक ओढवलेल्या संकटामुळे सर्वच घटक विविध प्रकारे कोरोनाबाधित झाले. त्यांना मदत देणे गरजेचे असल्याचे ओळखून गेल्या तीन महिन्यांपासून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माझे मदत कार्य सुरू होते. त्यामध्ये सुमारे १०० गावांत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीच्या होमिओपॅथी आरसेनिक अल्बम ३० या औषधाचे सव्वालाख कुटुंबियांना मोफत वाटप, सुमारे ७ हजार कुटुंबांची मोफत आरोग्य तपासणी केली. औषधोपचार, घरपोच मोबाईल डिस्पेन्सरी सेवा, निराधार गरीब व गरजू ५ हजार कुटुंबियांना मोफत शिधावाटप, असे मदतकार्य पुरेशी काळजी घेऊन मी पूर्ण केले. त्यामुळे अनेकांना दिलासाही मिळाला. 

या दरम्यान कोरोना संसर्गचा वाढता धोका लक्षात घेवून स्वतःहून कोरोना टेस्टही केली होती. त्यावेळी सुदैवाने ती निगेटिव्ह आली. दरम्यानच्या काळात गरजुंची अडचण ओळखून योग्य काळजी घेत आमचे मदतकार्य सुरुच होते. अखेर काल कोरोनाने मला गाठलेच. मी, माझे कुटुंब व कार्यकर्ते यांची जबरदस्त इच्छाशक्ती व सर्वांच्या सदिच्छेने, सहकार्याने कोरोनाच्या संकटातून मात करून लवकरच परतणार आहेच. मात्र, सध्या सर्वच ठिकाणी परिस्थिती अवघड होत चालली आहे. रुग्णसंख्या वाढत चालल्याने आरोग्ययंत्रणेवरही ताण येत असून रुग्णालयात जागेअभावी उपचारांची समस्या वाढत आहे. त्यामुळे सर्वानी योग्य काळजी घेत लॉकडाउनचे नियम पाळून घरातच राहणे आवश्यक आहे, असे आवाहनही प्रदिप कंद यांनी केले आहे.

Edited by : Nilesh Shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com