esakal | माळेगावच्या गोळीबार प्रकरणाला वेगळे वळण; माजी सरपंच जयदीप तावरे यांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

माळेगावच्या गोळीबार प्रकरणाला वेगळे वळण; माजी सरपंच जयदीप तावरे यांना अटक

माळेगावच्या गोळीबार प्रकरणाला वेगळे वळण; माजी सरपंच जयदीप तावरे यांना अटक

sakal_logo
By
कल्याण पाचांगणे : सकाळ वृत्तसेवा

माळेगाव : राष्ट्रवादीचे कार्य़कर्ते रविराज तावरे गोळीबार प्रकरणाचा तपास बारामती पोलिसांची कसोटी पहाणारा ठरत असतानाच जखमी तावरे यांच्या जबाबावरून माळेगावच्या नामांकित व्यक्तीचे नाव संशयीत आरोपींच्या यादीत आज आले आहे. त्यामध्ये माजी सरपंच जयदीप दिलिप तावरे (रा.माळेगाव) यांचा समावेश आहे. परिणामी माळेगावच्या गोळीबार प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.

विशेषतः याआगोदर वरील प्रकरणी चार आरोपींना जेरबंद करीत पोलिसांनी संबंधितांवर मोक्कातर्गत गुन्हे दाखल केली होते. त्यातच आता संशयित आरोपी जयदीप तावरे यांचे नाव पुढे आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. यावरून माळेगावच्या राजकारणात किती टोकाचा सत्तासंघर्ष आहे, हे स्पष्ट होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार यांनी हाॅस्पिटलमध्ये जावून जखमी तावरे यांची भेट घेतली होती. तसेच सुरू असलेल्या वैद्यकिय उपचारावर ते लक्ष ठेवून होते.

हेही वाचा: पुणे पालिकेवर आता २५० टन कचऱ्याचा जादा भार

दरम्यानच्या कालावधीत जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक डाॅ. अभिनव देखमुख यांनीही तावरे गोळीबार प्रकरणातील पाळेमुळे शोधून काढण्याचा प्रयत्न केल्याचे वरील कारवाईवरून स्पष्ट होतो. त्यानुसार तावरे यांच्यावर झालेल्या पोलिस कारवाईला विशेष महत्व प्राप्त होते. दरम्यान, माळेगाव बुद्रूक येथे राष्ट्रवादीचे कार्य़कर्ते रविराज तावरे यांच्यावर सोमवार (ता. ३१ मे ) रोजी राजकिय वैमनश्यातून गावटी कट्ट्याद्वारे गोळीबार झाला होता. त्या प्रकरणी तालुका पोलिसांनी तीन सराईत आरोपींसह एका अल्पवयीन मुलाविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगून खून करण्याचा प्रयत्न करणे आदी कलमान्यवे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी जखमी रविराज यांच्या पत्नी व जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांनी संबंधितांविरुद्ध पोलिसात फिर्य़ादी दिली होती. राजकीय व आर्थिक फायदा मिळविणे, तसेच माळेगावात दहशत माजविण्याच्या उद्देशाने प्रशांत पोपटराव मोरे, टाॅम उर्फ विनोद पोपटराव मोरे, राहुल उर्फ रिबेल कृष्णांत यादव ( सर्व रा. माळेगाव बुद्रूक, ता. बारामती ) यांच्यासह एक अल्पवयीन मुलाने पिस्तूलाद्वारे गोळी मारून माझ्या पतीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार सौ. तावरे यांनी फिर्य़ादीत नमूद केली होती. या फिर्य़ादीची तात्काळ दखल घेत पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी संबंधित आरोपींना अटक केली व त्यांच्यावर मोक्कांतर्गंत कारवाई केली.

ऐवढ्यावर हे प्रकरण थांबेल असे वाटत असतानाच जखमी रविराज यांच्या जबाबात आणखी महत्वपुर्ण माहिती पुढे आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. जयदीप तावरे गोळीबाराच्या कटात सहभागी असल्याची तक्रार रविराज यांनी केल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.

हेही वाचा: घटस्फोटाची चर्चा झाली अन् चेष्टा अंगलट आली!

पोलिस हादरले, तर गावकऱ्यांना धक्का

तावरे यांच्यावर गोळीबार करण्यासाठी वापरलेला गावटी कट्टा आरोपी प्रशांत मोरे यानेच नगर जिल्ह्यातून आणला होता. अर्थात या प्रकरणाचा मास्टर माईडच आरोपी प्रशांत मोरे हाच असून त्यानेच रविराज तावरे यांना संपविण्यासाठी कटकारस्थान रचले होते, हे आजवरच्या पोलिस तपासात पुढे आले होते. परंतु जखमी रविराज यांच्या प्रकृतीची सुधारणा झाल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्यांचा जबाब घेतला असता गोळीबारच्या कटात जयदीप तावरे यांचे नावे पुढे आल्याने पोलिसही हादरले, तर गावकऱ्यांनाही धक्का बसला. पोलिसांनी तावरे यांना अटक केली आहे.

loading image