खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष बळीराम सावंत यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष बळीराम सावंत यांचे निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते. पुणे महापालिकेच्या विद्यमान नगरसेविका शीतल सावंत यांचे सासरे तसेच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विद्यमान सदस्य अभय सावंत यांचे काका व  पुण्याचे माजी महापौर भारत सावंत यांचे मोठे बंधू होते.

खडकी बाजार (पुणे) : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष बळीराम सावंत यांचे निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते. पुणे महापालिकेच्या विद्यमान नगरसेविका शीतल सावंत यांचे सासरे तसेच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विद्यमान सदस्य अभय सावंत यांचे काका व  पुण्याचे माजी महापौर भारत सावंत यांचे मोठे बंधू होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बळीराम सावंत यांनी तीस वर्षे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य व उपाध्यक्षपद भूषविले होते. १९८४ साली त्यांनी काँग्रेस आय कडून आमदारकीची निवडणूक ही लढवली होती. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी खडकी साप्रस संगमवाडी येथे अनेक कामे मार्गी लावली होती. खडकीतील मैला पाणी शुद्धीकरण केंद्र, स्मशानभूमी, भूमिगत गटारींची पाइपलाइन तसेच इतर विधायक कामे ही केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Vice President of Khadki Cantonment Board Baliram Sawant passed away