अडचणीत असलेल्या तरंगे कुंटूबास झेडपीच्या माजी सभापतींनी केली आर्थि्क मदत 

राजकुमार थोरात
Sunday, 8 November 2020

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे कुंटूब अडचणीमध्ये आले होते. मात्र जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर तरंगे कुंटूबाला दीड लाख रुपयाची आर्थिक मदत केली.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील तरंगवाडीमधील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे कुंटूब अडचणीमध्ये आले होते. मात्र जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर तरंगे कुंटूबाला दीड लाख रुपयाची आर्थिक मदत केल्यामुळे अडचणीमध्ये असलेल्या कुंटूबाची दिवाळी गोड होणार आहे.

हेही वाचा -  तपासाबात नातेवाईकांची नाराजी; मृतदेह ताब्यात घेण्यास दिला नकार -

इंदापूर तालुक्यातील तरंगवाडीमधील बबन तरंगे यांचा गेल्या सव्वादोन महिन्यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाल्याने  मृत्यू झाला. बबन तरंगे हे कुंटूबातील कर्ते व कमवते होते. घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यामुळे तरंगे कुंटूबावर मोठा आघात झाला.

कुंटूबामध्ये आई कामिनी, पत्नी वैशाली  व सहा महिन्याचा  मुलगा प्रणव व भाऊ अनिल  तरंगे यांच्यावर संकट कोसळले.  बबन तरंगे हे  ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागामध्ये काम करुन सोनाई डेअरीमध्ये पार्ट टाईम काम करीत होते.

हेही वाचा - आता काँग्रेसवर टीका करणारेच उद्या काँग्रेस पक्षात येतील -

ऐन दिवाळीच्या तोंडावर कुंटूब अडचणीमध्ये आल्यामुळे  माजी सभापती प्रवीण माने यांनी आज रविवार (ता.८) रोजी तरंगे कुंटूबाला दीड लाख रुपयांचा धनादेश दिला. यावेळी तरंगवाडीचे माजी उपसरपंच तुकाराम करे, शिरसोडीचे माजी सरपंच नानासाहेब नरुटे, संतोष तरंगे, गणेश मराडे, अमोल मराडे उपस्थित होते.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former ZP chairpersons helped the troubled families