esakal | डिजीटल वारीतून साकारले पांडुरंगाचे निराकार रूप
sakal

बोलून बातमी शोधा

wari

डिजीटल वारीतून साकारले पांडुरंगाचे निराकार रूप

sakal_logo
By
सम्राट कदम : सकाळ वृत्तसेवा

पुणे : इंद्रायणी (Indrayani) तीरावरील विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाची केवळ वारकऱ्यांनाच नव्हे, तर महाराष्ट्रातील आबालवृद्धांना, थोरा मोठ्यांना सर्वांनाच आस लागलेली असते. कोरोनामुळे (corona)मागील दोन वर्षांपासून पंढरीची वारी बंद आहे. त्यामुळे जो तो आपल्या पद्धतीने पांडुरंगाच्या दर्शनाचं आणि वारीच्या समृद्ध वारशाच जतन करत आहे. मग, यात तंत्रज्ञानाने आधुनिक बनलेली पिढी मागे कशी राहील. मल्टिमीडिया आणि ॲनिमेशनमध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी चक्क थ्री-डी डिजीटलवारीची सफर घडवून आणली आहे. (formless form Panduranga created through digital Wari)

कोरोना (corona) काळात जीवाचीबाजी लावून काम करणारे कोविड योद्धे आणि पांडुरंगाच निर्गुण साकार रूपाची सांगड या विद्यार्थ्यांनी ही डिजिटलवारी साकारली आहे. ओम भरमगुंडे, हर्षल वाळके, ओंकार जंगम, संकेत पतके, राजेश हिम्मतराव पाटील, ओम संगवार, आशुतोष नवाळे आणि ऋषिकेश भाबड या विद्यार्थ्यांनी हा अनोखा उपक्रम राबवला आहे. नवाळे सांगतो, "घर बसून लोकांना वारीचा आनंद लुटता यावा यासाठी पिक्सेलसक्वाड ही आमचा चमू आणि कलातीर्थ यांनी मिळून डिजिटल वारी उपक्रम राबवला आहे. त्यावर गेल्या एक महिन्यांपासून काम करत असून, नुकताच हा तीन मिनिटांचा व्हीडीओ आम्ही इन्स्टाग्राम आणि युट्युबवर प्रस्तुत केला आहे." प्रसाद सपकाळ, कलातीर्थचे संस्थापक अमोल काळे आणि अश्विनी काळे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे विद्यार्थी सांगतात.

हेही वाचा: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रूग्णालयात दाखल

अशी पहा डिजिटल वारी..

विद्यार्थ्यांनी जवळपास ५० चित्र संगणकावर साकारले. एका चित्रासाठी सुमारे सहा ते आठ तास वेळ लागतो. त्यानंतर त्या चित्रांचा त्रिमितीय आभास निर्माण केला. चित्राला समर्पक ठरेल असे संगीत आणि आवाज त्या व्हिडीओला देण्यात आला. हा व्हिडिओ पाहण्यासाठी युट्युबवरील Gyan vatap या चॅनलला भेट देऊ शकता.

याबाबत बोलताना ओम भरमगुंडे म्हणाले, "विठ्ठलाच्या विटेपासून ते हृदयापर्यंतचा प्रवास म्हणजेच संपूर्ण वारी दर्शन आपल्याला अनुभवता येईल. या उपक्रमात लहानापासून मोठयापर्यंत, संत , स्त्रिया, पुरुष मंडळी यांचा सहभाग आहे. तसेच देवरूपी माणसांचा म्हणजेच पोलिस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी ,शेतकरी ज्यांनी करोना काळात लोकांना मदत केली यांचा सुद्धा या उपक्रमात समावेश केलेला आहे."

loading image