esakal | दौंड, इंदापूर, हवेलीच्या शेतकऱ्यांना बसणार फटका कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

Forty day rotation from Khadakwasla canal closed within twenty one days

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप गुलदगड यांनी सांगितले की,"रब्बी पिकांसाठी आत्तापर्यंत डिसेंबर महिन्यात कधीच आवर्तन आले नव्हते. यावर्षी कोणतीही पूर्वकल्पना न देता पाटबंधारे विभागाने रब्बी पिकांसाठी अगोदरच आवर्तन सोडले. अगोदर पाणी आल्याने शेतकऱ्यांना आनंद झाला होता, परंतु आवर्तन पूर्ण होण्याच्या अगोदरच पाणी बंद केल्याने ज्या शेतकऱ्यांची नदीवरून लिफ्टची सोय नाही अशा लहान शेतकर्‍यांना याचा मोठा फटका बसणार आहे.

दौंड, इंदापूर, हवेलीच्या शेतकऱ्यांना बसणार फटका कारण...

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी : खडकवासला कालव्यातून दौंड इंदापूर व हवेलीच्या शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी सुरू केलेले आवर्तन पाटबंधारे विभागाने एकविसाव्या दिवशीच बंद केल्याने लहान शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. कालव्यातून पाणी सोडताना हे आवर्तन 40 दिवसांचे असेल असे पाटबंधारे विभागाकडून कळविण्यात आले होते परंतु आवर्तनाचा कालावधी पूर्ण होण्याआधीच पाटबंधारे विभागाने पाणी बंद केले आहे. 15 डिसेंबर 2019 ला सुरू झालेले आवर्तन सुमारे 25 जानेवारी 2020 पर्यंत चालणे अपेक्षित होते.
खेड-शिवापूर टोलनाक्याबाबत 'हा' मॅसेज होतोय व्हायरल 
 
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप गुलदगड यांनी सांगितले की,"रब्बी पिकांसाठी आत्तापर्यंत डिसेंबर महिन्यात कधीच आवर्तन आले नव्हते. यावर्षी कोणतीही पूर्वकल्पना न देता पाटबंधारे विभागाने रब्बी पिकांसाठी अगोदरच आवर्तन सोडले. अगोदर पाणी आल्याने शेतकऱ्यांना आनंद झाला होता, परंतु आवर्तन पूर्ण होण्याच्या अगोदरच पाणी बंद केल्याने ज्या शेतकऱ्यांची नदीवरून लिफ्टची सोय नाही अशा लहान शेतकर्‍यांना याचा मोठा फटका बसणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दौंड तालुक्यातील केडगाव, खोपोडी, दापोडी, बोरी पारधी, कडेठाण, वरवंड, पाटस, कानगाव, गिरिम, नानवीज या गावांतील शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे. पाटबंधारे विभागाने लहान शेतकऱ्यांचा विचार करून आवर्तन चालू ठेवायला हवे होते." त्याचप्रमाणे शेतकरी बाळासाहेब फराटे, दौंड तालुक्यातील केडगावचे शेतकरी संतोष हंडाळ, सुहास रुपनवर, बोरिपारधीचे उपसरपंच सुनील तोडनवर यांनीही पाटबंधारे विभागाने पाणी बंद केल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
2022 मध्ये शरद पवार होणार राष्ट्रपती?; संजय राऊतांचे नवे मिशन

पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता,"शेतकऱ्यांनी पाणी घेण्यास नकार दिला त्यामुळे आवर्तन बंद करावे लागले. गरज पडल्यास काही दिवसांनी पुन्हा आवर्तन सोडले जाणार आहे,"अशी माहिती त्यांनी दिली. 

loading image