2022 मध्ये शरद पवार होणार राष्ट्रपती?; संजय राऊतांचे नवे मिशन

Sanjay Raut, Sharad Pawar
Sanjay Raut, Sharad Pawar

मुंबई : महाराष्ट्रात कोणी विचारही केला नव्हते असे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना एकत्र आणून सरकार स्थापन करण्याची किमया करणारे शिवसेना खासदार संजय राऊत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना 2022 मध्ये राष्ट्रपती करण्यासाठी सरसावले आहेत.

'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये भाजप विरोधी पक्षांची मोट बांधून शरद पवार यांना राष्ट्रपती बनविण्यासाठी संजय राऊत यांनी रणनिती आखली आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय गणिते बदलण्याचा विचार राऊत यांचा आहे. आगामी राष्ट्रपती निवडणुकीत बिगरभाजप दलाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार हे शरद पवार असावेत, अशी भूमिका राऊत यांनी घेतली आहे. यासाठी राऊत हे पवार यांची मनधरणी करणार आहेत. 

राऊत हे 'टाईम्स'शी बोलताना म्हणाले, की पुढील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत माझ्या मते आकडे आमच्या बाजूने असणार आहेत. याविषयी सविस्तर काम करण्यास लवकरच सुरवात करणार आहे. पवारसाहेबांशी याविषयी पहिल्यांदा बोलणार आहे, त्यांची सहमती आल्यानंतर पुढे काम सुरु करणार आहे. पवारसाहेब हे देशातील ज्येष्ठ नेते असून, ते एक धुरंदर राजकारणी आहेत. त्यांना प्रशासनाचा दीर्घ अनुभव आहे, याचा फायदा नक्कीच देशाला होईल.  

लोकसभेत जरी भाजपकडे बहुमत असलं, तरी राज्यसभेत ते नाही. तसेच, देशातील राजकीय स्थिती बदलत असून बिगरभाजपचे राज्य असलेली सरकारे आगामी राष्ट्रपती निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावतील. शरद पवार हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, तर निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक मतांचे गणित जुळून येऊ शकते. राष्ट्रपती निवडणुकीसाठी अजून दोन वर्षे वेळ असताना आतापासूनच संजय राऊत यांनी आताच या कामाला सुरवात केली आहे. बिगरभाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये जाऊन संजय राऊत त्या-त्या पक्षाच्या मुख्यमंत्री आणि नेतृत्त्वांना भेटणार आहेत. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, केरळचे मुख्यमंत्री पी विजयन, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांसह इतरांना भेटून चर्चा करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com