पु्णे : ते चोरायचे मौजमजेसाठी दुचाकी; मग हडपसर पोलिसांनी...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

  • मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या चौघांना हडपसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या 
  • चोरट्यांमध्ये व्यावसायिक डान्सरचा सहभाग 

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागातुन केवळ मौजमजेसाठी तब्बल 25 दुचाकी चोरणाऱ्या चौघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 12 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या 25 दुचाकी जप्त करण्यात आल्या. दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांमध्ये एका व्यावसायिक डान्सरचा समावेश आहे. संबंधीत चोरट्यांकडून वाहनचोरीचे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संजय हरिष भोसले उर्फ सोन्या (वय 20), ऋषीकेश बाबासाहेब डोंगरे उर्फ बिट्टु (वय 19 ), अभिषेक अनिल भंडगे उर्फ मोनु (वय 19 ), अजित कैलास कांबळे उर्फ विठ्ठल (वय 21, रा. सर्व रा. शेवाळवाडी ) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी पत्रकार परिषेदेत दिली. हडपसर पोलिस रात्रगस्त घालत होते. त्यावेळी मगरपट्टा चौकातील वाहन पार्कींगमध्ये चौघेजण संशयास्पद फिरत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक संजय चव्हाण, प्रताप गायकवाड, नितीन मुंढे, विनोद शिवले, अकबर शेख, शाहीद शेख यांना मिळाली.

ट्रम्प म्हणतात, दहा वर्षात होणार भारतातील गरिबी दूर

त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन संजय, ऋषिकेश, अभिषेक व अजितला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ते दुचाकी वाहने चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांनी हडपसर परिसरातुन 11 दुचाकी, वानवडी, कोंढवा, सिहंगड, सहकानगर, मार्केटयार्ड, येरवडा, शिवाजीनगर, लोणीकंद, लोणीकाळभोर, यवत, शिवाजीनगर, लातुर व अन्य काही ठिकाणांहून 25 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या चोरलेल्या दुचाकी ते ग्रामीण भागामध्ये विकणार होते. या प्रकरणामध्ये संजय भोसले याने अन्य तिघांना आपल्या समवेत घेऊन वाहन चोरीचे प्रकार केले. चौघांपैकी अभिषेक भंडगे हा व्यावसायिक डान्सर आहे. तो एका नामांकीत डान्स अॅकॅडमीच्यावतीने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नृत्य सादर करतो. चौघेही मागीर सहा महिन्यांपासून केवळ मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरी करत होते. यावेळी सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four arrested for two Wheeler stolen

Tags
टॉपिकस
Topic Tags: