कोरोनामुळे एकाच दिवशी भिगवणमध्ये चार तर, अकोले येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह

Four in Bhigwan and one in Akole patients tested corona positive in a day
Four in Bhigwan and one in Akole patients tested corona positive in a day

भिगवण : मागील अडीच महिन्यांपासुन रोखुन धरलेल्या कोरोनाने अखेर भिगवण स्टेशन येथे शिरकाव केला आहे. सोमवारी (ता.१३) एकाच दिवशी भिगवण स्टेशन येथील कोरोना रुग्णांच्या संपर्कातील तीन महिला व एक पुरुष असे एकुण चार व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे भिगवण स्टेशन येथे आत्तापर्यंत कोरोनामुळे दोघांचा मृत्यू तर इतर चार पॉझिटिव्ह रुग्ण असे चित्र असून दिसून आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भिगवण स्टेशन येथे २८ एप्रिलला एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आली होती. त्यानंतर १० जुलैला आणखी एक महिला पॉझिटिव्ह आढळुन आली. या दोन्ही महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. परंतु त्यानंतर १० जुलैला पॉझिटिव्ह आलेल्या महिलेल्या संपर्कातील १४ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली होती तर, इतर १६ जणांना होम कोरंटाईन केले होते. सोमवारी(ता.१३) सायंकाळी उशिरा चाचणीचे अहवाल प्राप्त झाले त्यापैकी तीन महिला व एक पुरुष कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

भिगवण स्टेशन येथील एकाच कुटुंबातील चार व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे भिगवण स्टेशन व भिगवण परिसरामध्ये खबबळ उडाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एक महिला ही भिगवण येथील दुकानांमध्ये काम करत होती त्यामुळे त्यानिमित्ताने भिगवण शहरालाही कोरोनाचा धोका वाढला आहे. भिगवण बरोबरच भिगवण जवळील अकोले (ता.इंदापुर) येथेही एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे, त्यामुळे कोरोना भिगवण सारख्या मोठ्या गावांबरोबरच छोटया गावांमध्येही पाय पसरु लागल्याचे चित्र समोर येत आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणुन भिगवण स्टेशन परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत करुन सील केले आहे तर भिगवण, तक्रारवाडी, मदनावडी, डिकसळ (ता.इंदापुर) आदी गावे ही बफर झोन घोषीत केली आहे. दरम्यान, एका बाजुला कोरोना पाय पसरत असल्याचे चित्र असताना, दुसऱ्या बाजुला भिगवणमध्ये गर्दी दिसत असून सोशल डिस्टन्सिगच पालन नसल्याचे दिसते.  व्यावसायिकांकडूनही फारशी खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र दिसत आहे. वाढती गर्दी व आढळुन आलेले रुग्ण यामुळे भिगवण परिसरास कोरोनाचा धोका वाढला आहे.

Breaking : महाविद्यालय स्तरावर होणार परीक्षा?; 'यूजीसी'चे उपाध्यक्ष काय म्हणाले पाहा!


याबाबत भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने म्हणाले, ''भिगवण स्टेशन येथील एकुण चार रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे ही चिंतेची बाब आहे. नागरिकांनी आत्तातरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन नियमांचे पालन करावे. पेठेमध्ये अनावश्यक गर्दी करु नये तसेच मास्क, सोशन डिस्टसिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com