esakal | बारामतीत रुग्णसंख्येने गाठला चारशेचा टप्पा

बोलून बातमी शोधा

covid19
बारामतीत कोराेना रुग्णसंख्येने गाठला आज चारशेचा टप्पा
sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती.

बारामती : कोरोना रुग्णांच्या संख्येने आज चारशेचा टप्पा गाठल्यानंतर प्रशासनही अँक्शन मोडमध्ये आले आहे. एकीकडे सुविधा निर्माण करण्यासह दुसरीकडे ही साखळी तोडण्याचा प्रयत्न आता वेगाने सुरु झाला आहे. काल बारामतीत 1105 जणांच्या तपासणीमध्ये तब्बल 395 जण पॉझिटीव्ह आढळले. रुग्ण आढळण्याचे प्रमाण सातत्याने तीस टक्क्यांहून अधिक आहे. ही साखळी मोडण्यासाठी रुग्णांचे प्रमाण दहा टक्क्यांहून कमी होणे गरजेचे असल्याने प्रशासन आजपासून अँक्शन मोडमध्ये आहे. बारामतीत रुग्णसंख्या आता 15 हजारांच्या टप्प्याकडे चालली आहे. आज रुग्णसंख्या 14282 झाली असून 10801 रुग्ण बरे झाले आहेत, तर मृत्यूचा आकडा 228 इतका झाला आहे.

हेही वाचा: जुन्नर : ट्रॅक्टर अपघातात वडील-मुलाचा दुर्दैवी मृत्यू

आज पोलिसांनी शहरात जागोजागी रस्त्यावर फिरणा-या नागरिकांना थांबवून चौकशी केली. अनेक विनाकारण फिरणा-यांची थेट आरटीपीसीआर तपासणी करण्याचा निर्णय पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी घेतला होता. पोलिस गाडीतून शासकीय तपासणी केंद्रावर काही जणांना नेत त्यांची तपासणी केली गेली. अकरापर्यंतच अत्यावश्यक सेवांना परवानगी दिलेली असल्याने अकरा वाजता किराणा, फळे, दूध, भाजीपाला, बेकरीतील विक्री बंद झाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. एकीकडे लॉकडाऊन असला तरी रस्त्यावरील वर्दळ मात्र काही केल्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. काल एकाच दिवसात बारामतीत 22 मृतदेहांवर नगरपालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार केले गेले. या पैकी 16 जण हे बारामती शहर व तालुक्यातील आहेत. सरकारी रुग्णालयातच या पैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: पुणे : गुन्हेगाराला अटक करण्यास गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर कोयत्याने वार

तपासणीसाठी उसळतेय गर्दी....बारामतीत शासकीय तपासणी केंद्रावर मोठी गर्दी होत असल्याने आता तालुक्यातील पणदरे, सोमेश्वरनगर व मोरगाव येथेही तपासणी केंद्र सुरु करण्याच्या दिशेने काम सुरु झाले आहे. बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालयातील स्वॅब तपासणी केंद्रावर कमालीचा ताण येऊ लागल्याने व लोकांना तपासणीसाठी तालुक्यातून बारामतीपर्यंत यावे लागत असल्याने हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले.