
Human Trafficking
Sakal
पणजी/ पुणे : वेश्याव्यवसायासाठी गोव्यात आणल्या जाणाऱ्या महिलांमध्ये महाराष्ट्रातील महिलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे पाहता गोव्यातील ‘अर्ज’ (‘एआरझेड’-अन्यायरहित जिंदगी) संस्थेने महाराष्ट्रात जिल्हानिहाय कार्यशाळा घेत जनजागृतीची मोहीम हाती घेतली. आतापर्यंत महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात कार्यशाळा घेण्यात आल्या. गेल्या पाच वर्षांत सुमारे चारशेहून अधिक मुलींना वाचविण्यात आले आहे.