
पुणे : भारतात बेकायदा घुसखोरी करून गेल्या चार महिन्यांपासून कोंढवा परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या मदतीने कोंढवा पोलिसांनी ही कारवाई केली.