अचानक मिनीबस रस्त्यावरील चहाच्या टपरीत शिरली अन्....

Four injured in Mini Bus collision at Khandoba Mal Chowk in Akurdi Pimpri
Four injured in Mini Bus collision at Khandoba Mal Chowk in Akurdi Pimpri

पिंपरी : मिनी बस चहाच्या टपरीला धडकल्याने चार जण जखमी झाल्याची घटना आकुर्डीतील खंडोबा माळ चौकाजवळ घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गुरुवारी (ता. 20) सकाळी नऊच्या सुमारास एक मिनीबस चिंचवडकडून आकुर्डीतील खंडोबा माळ चौकाकडे येत होती. एका वाहचाला वाचविण्याच्या प्रयत्नात मिनीबस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्यालगत असलेल्या चहाच्या टपरीला धडकली. यामध्ये चार जण जखमी झाले.

आई रागावली म्हणून 12 वर्षीय मुलगी घर सोडून गेली अन् एका आजीने तिला...

जखमींना उपचारासाठी तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी बघ्यांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com