'भाजप'मय झालेल्या काँग्रेसच्या चार सदस्यांनी दिले राजीनामे!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 October 2019

खडकी बाजार : कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढून निवडून आलेल्या आणि गेल्या चार वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या आमदारासोबत प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावणाऱ्या चौघांना पुणे शहर काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस पाठविली होती. या नोटीसीचे उत्तर न देता काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी आणि त्यांच्या एका सहयोगी नगरसेवकाने शनिवारी (ता.5) दुपारी आपले राजीनामे काँग्रेसकडे दिले आहेत.

खडकी बाजार : कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढून निवडून आलेल्या आणि गेल्या चार वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या आमदारासोबत प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावणाऱ्या चौघांना पुणे शहर काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस पाठविली होती. या नोटीसीचे उत्तर न देता काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी आणि त्यांच्या एका सहयोगी नगरसेवकाने शनिवारी (ता.5) दुपारी आपले राजीनामे काँग्रेसकडे दिले आहेत.

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले सुरेश कांबळे, अभय सावंत, कमलेश चासकर आणि काँग्रेस सहयोगी बोर्डाचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर यांनी काँग्रेस भवन येथे जाऊन आपले राजीनामे दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.

हे चारही नगरसेवक खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य असून त्यांनी काँग्रेस पक्षाचा एकही कार्यक्रम घेतला नव्हता. तसेच काँग्रेसच्या एकाही कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली नव्हती. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्या नावे कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. 

अधिक माहिती घेण्याकरिता बोर्डाचे सदस्य सुरेश कांबळे आणि कमलेश चासकर यांनी राजीनामा दिल्याचे कबूल केले. मात्र, अभय सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. स

सध्या खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्षपद भूषवित असलेले काँग्रेसचे सहयोगी सदस्य दुर्योधन भापकर यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. दरम्यान, सदस्य सुरेश कांबळे यांनी पत्रकार परिषदेत संबंधित प्रकरणाची पूर्ण माहिती देऊ, असे सांगितले.

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात गेल्या चार वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. बोर्डात काँग्रेस पक्षाचे पाच सदस्य आणि एक काँग्रेस पक्ष सहयोगी सदस्य आहे. ते भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहायचे. भाजपच्या आमदारांबरोबरही अनेकवेळा यांचे फ्लेक्स झळकले आहेत. काँग्रेस पक्षाविरोधात संबंधितांनी कृत्य केल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्याचे उत्तरही त्यांनी दिले नव्हते. मी काँग्रेस भवनमध्ये हजर नसताना या चारही नगरसेवकांनी कार्यालयात राजीनामे दिले आहेत.
- रमेश बागवे, अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा काँग्रेस

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचाच अर्ज बाद

- #Vidhansabha 2019 युतीत नाराज असलो, तरी दुसरा पर्याय नाही : रामदास आठवले

- Vidhan Sabha 2019 : पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात 27 अर्ज बाद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four members of Congress from Pune Cantonment Board resigned