esakal | धक्कादायक, कोरोनाचा रिपोर्ट पॅाझिटिव्ह आल्याचे ऐकूनच आला हार्ट अटॅक
sakal

बोलून बातमी शोधा

corona1

दौंड उप जिल्हा रूग्णालयाकडून ३२ जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३ जुलै रोजी रात्री आलेल्या अहवालानुसार दौंड शहरातील

धक्कादायक, कोरोनाचा रिपोर्ट पॅाझिटिव्ह आल्याचे ऐकूनच आला हार्ट अटॅक

sakal_logo
By
प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, आज एका ज्येष्ठ राजकीय पदाधिकाऱ्यासह एकूण चार नागरिकांना बाधा झाली आहे. गेल्या सहा दिवसांत ३३ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून, एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. 

कोरोनामुळे अनेक व्यवसाय अडचणीत, पण हा व्यवसाय तेजीत

दौंड उप जिल्हा रूग्णालयाकडून ३२ जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३ जुलै रोजी रात्री आलेल्या अहवालानुसार दौंड शहरातील चार जणांना बाधा झाली आहे, अशी माहिती उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली. 

कोरोनामुक्त रुग्ण घरी परतल्यावर स्वागत करताय तर... 

दौंड शहरात कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या वडार गल्ली, पानसरे वस्ती, जनता कॅालनी व डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील २७ ते ७६ या वयोगटातील चार नागरिकांना बाधा झाली आहे. शहरातील बाधितांची संख्या ३१ असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

दौंड शहरातील कुंभार गल्ली येथील ६२ वर्षीय नागरिकाचा घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. २ जुलै रोजी दुपारी सदर नागरिकास वैद्यकीय अहवाल पॅाझिटिव्ह आल्याचा निरोप आल्यानंतर ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. शहरात २५ मे ते २ जुलै या कालावधीत तीन महिलांसह एकूण ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

loading image