esakal | हाजीर हो! बडतर्फ पोलिस जगतापसह चौघांना कोर्टाचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Court

आरोपी प्रकाश फाले याने एका गिरणी व्यावसायिकास औंधमधील ब्रेमेन चौकाजवळ असलेल्या एका जमिनीचा आपण व्यवहार करत असून त्यामध्ये पैसे गुंतविल्यास दुप्पट नफा होईल, असे आमिष दाखविले.

हाजीर हो! बडतर्फ पोलिस जगतापसह चौघांना कोर्टाचे आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : फसवणूक व खंडणी उकळण्याच्या गुन्ह्यातील आरोपी बडतर्फ पोलिस शैलेश जगतापसह चौघांना 72 तासांत हजर होण्याचे आदेश दिल्यानंतर न्यायालयाने त्यांची 14 दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपींना दिलेल्या जामिनावर पोलिस आणि सरकारी पक्षाने सत्र न्यायालयात अपील केले होते. त्या अपिलात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.पी. पिंगळे यांनी हा आदेश दिला.

हाताला काम नाही, जगायचं कसं? असंघटित कामगारांचा पुण्यात 'ताटली सत्याग्रह'!​

जयेश जगताप, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, परवेझ जमादार आणि पत्रकार देवेंद्र जैन यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी प्रकाश फाले याने एका गिरणी व्यावसायिकास औंधमधील ब्रेमेन चौकाजवळ असलेल्या एका जमिनीचा आपण व्यवहार करत असून त्यामध्ये पैसे गुंतविल्यास दुप्पट नफा होईल, असे आमिष दाखविले. त्यानंतर त्यांनी व्यावसायिकाकडून 17 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी वानवडी पोलिसांत फाले कुटुंबीय, जगताप, माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे यांच्यासह 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यात 28 सप्टेंबरला फाले याला न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला एक दिवस पोलिस कोठडी सुनावली. तर जयेश आणि शैलेश जगताप, जमादार आणि जैन यांना जामीन देण्यात आला होता.

चोरट्यांचं धाडस तरी किती; वर्दळीच्या रस्त्यावरून पळवलं मंगळसूत्र!​

न्यायालयाने दिलेल्या या आदेशावर पोलिस आणि सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात अपील करीत पुढील तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने जामिनाचा आदेश बरखास्त करीत 72 तासांत आरोपींनी न्यायालयात हजर व्हावे, असे आदेश बुधवारी दिले आहेत. फिर्यादी यांची फसवणूक झालेल्या 17 लाखांपैकी किती रक्कम या चार आरोपींना मिळाली, आरोपींनी औंधमधील एका प्लॉटची खोटी कागदपत्रे कुठे बनवली, गुन्ह्यांचा कट कुठे रचला, त्यात कोणाचा काय सहभाग आहे, याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलिस कोठडी देणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केला.

लॉकडाऊन काळात सुनावलेली सर्वांत मोठी कोठडी :
लॉकडाऊन काळात केवळ महत्त्वाच्या प्रकरणांतील आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात येत आहे. मार्चनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे आरोपींचा थेट 14 दिवस पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती ऍड. कावेडिया यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image