नारायणगावात मध्यरात्री लागली आग; चार दुकाने भस्मसात

रवींद्र पाटे
Tuesday, 20 October 2020

मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास या दुकानांना आग लागली. या बाबतची माहिती समजताच नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डी. के.गुंड यांनी तातडीने जुन्नर व चाकण नगर परिषद यांच्याशी संपर्क साधून आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाची गाडी पाठवण्याची विनंती केली. दरम्यान स्थानिक नागरिकांनी पाण्याचे टँकर आणून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. यामुळे शेजारील दुकानांना आग लागण्याचा धोका टळला

नारायणगाव : येथील पुणे नाशिक महामार्गालगत नारायणगाव पोलिस स्टेशन समोर असलेल्या दुकानांना सोमवारी( ता.१९) मध्यरात्रीच्या सुमारास आग लागून चार व्यावसायिकांची दुकाने जळून खाक झाली. आगीत कृषी पंप व टायर दुकानाचे सुमारे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. आग इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे 
 क्लिक करा

येथील पुणे नाशिक महामार्गालगत मनोहर दळवी व महेंद्र दळवी यांच्या मालकीचे चार गाळे आहेत. हे गाळे त्यांनी उमेश मेहता, नासिर इस्माईल, दीपक डोके यांना भाडे तत्वावर दिले आहेत. या गळ्यात  मेहता यांचे विनायक अग्रो इंडस्ट्री, दीपक डोके यांचे साक्षी ऍग्रो हे कृषी पंप विक्री व दुरुस्तीचे तर नासिर इस्माईल अली यांचे टायर विक्री व पंचर काढण्याचे दुकान होते.

मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास या दुकानांना आग लागली. या बाबतची माहिती समजताच नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डी. के.गुंड यांनी तातडीने जुन्नर व चाकण नगर परिषद यांच्याशी संपर्क साधून आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाची गाडी पाठवण्याची विनंती केली. दरम्यान स्थानिक नागरिकांनी पाण्याचे टँकर आणून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. यामुळे शेजारील दुकानांना आग लागण्याचा धोका टळला.

"वर्क फ्रॉम होम'मुळे जीवनशैलीच बिघडली; महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम

मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अग्निशामक दलाची दोन वाहने घटनास्थळी दाखल झाली. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास आग विझवण्यात यश आले. मात्र आगीत चार दुकानातील किंमती कृषी पंप, टायर व पंचर दुकानातील मशिनरी जळून खाक झाले. व्यावासायिकांचे सुमारे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाले असून ही आग इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी  मंदार जावळे सो यांनी भेट दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four shops burnt down in the fire broke out in Narayangaon at midnight