
पुणे : शिष्यवृत्ती योजनेचे चार हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित
पुणे : जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे महाविद्यालय स्तरावर चार हजार ३०५ अर्ज प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढावेत, असे निर्देश सूचना समाज कल्याण विभागातर्फे देण्यात आले आहेत.
२०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी महाडीबीटी पोर्टल डिसेंबर २०२१ पासून सुरु करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत २०२१-२२ साठी ३९ हजार ८२६ अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. परंतु महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित असल्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यास विलंब होत आहे. अर्जाची छाननी करुन पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ द्यावा, असे निर्देश सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित राहिल्यामुळे अनुसूचित जातीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित आहेत. त्याची सर्व जबाबदारी महाविद्यालयांची असून, संबंधित महाविद्यालयांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
- संगीता डावखर, सहायक आयुक्त, समाज कल्याण
शैक्षणिक वर्ष २०२१-२२
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज - ३९ हजार ८२६
प्रलंबित अर्ज - ४ हजार ३०५
Web Title: Four Thousand Applications For Scholarship Scheme Are Pending Department Of Social Welfare
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..