पुणे-सोलापूर मार्गावर मेगाब्लॉक: 'या' चार गाड्या शनिवारी रद्द

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 March 2020

शनिवारी सकाळी पावणे बारा ते सायंकाळी सहा वाजून 10 मिनिटांपर्यंत हा "ब्लॉक' असेल. त्यामुळे शनिवारी दौंड-पुणे-दौंड पैंसेजर आणि पुणे-सोलापुर एक्‍सप्रेस, सोलापुर-पुणे इटरसिटी एक्‍सप्रेसही रद्द करण्यात आली आहे. बारामती-पुणे ही गाडी शनिवारी दौंड स्थानकापर्यंत धावेल. ही रेल्वे गाडी दौंड- पुणे स्थानका दरम्यान धावणार नाही.

पुणे : मध्य रेल्वेच्या दौंड- पुणे विभागात भुयारी मार्ग तयार करण्यासाठी दौंड- पाटस स्थानकांदरम्यान काम होणार असल्यामुळे येत्या शनिवारी (ता. 7) साडेसहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील पुणे- दौंड- पुणे पॅसेंजर आणि सोलापूर इंटरसिटी एक्‍स्प्रेस शनिवारी रद्द करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
शनिवारी सकाळी पावणे बारा ते सायंकाळी सहा वाजून 10 मिनिटांपर्यंत हा "ब्लॉक' असेल. त्यामुळे शनिवारी दौंड-पुणे-दौंड पैंसेजर आणि पुणे-सोलापुर एक्‍सप्रेस, सोलापुर-पुणे इटरसिटी एक्‍सप्रेसही रद्द करण्यात आली आहे. बारामती-पुणे ही गाडी शनिवारी दौंड स्थानकापर्यंत धावेल. ही रेल्वे गाडी दौंड- पुणे स्थानका दरम्यान धावणार नाही.

धक्कादायक:पुणे-मुंबई प्रवासात उबर ड्रायव्हर झोपला; महिलेनेच चालवली कॅब
 
अजनी एक्‍सप्रेस, झेलम एक्‍स्प्रेस, या गाड्या सात मार्च रोजी तर, निजामुद्दीन-वास्को-द-गामा गोवा एक्‍सप्रेस सहा मार्च रोजी दौंड कॉर्ड लाईनमार्गे धावेल. ब्लॉकमुळे काही गाड्यांना 10 ते 30 मिनिटे विलंब होऊ शकतो, हे लक्षात घेऊन प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four trains cancelled on Saturday due to block on Solapur Way