सिग्नल तोडून गेल्यावर पकडलं म्हणून पोलिसांना धक्काबुक्की

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 January 2021

आरोपींनी पोलिसाला धक्काबुक्की करीत ढकलून दिले. त्यामुळे अंमलदार जखमी झाले आहेत. शशिकांत पंचलाल जयस्वाल (वय २०), देवेंद्र रामप्यारे जयस्वाल (वय २१), दीपक रामप्यारे जयस्वाल (वय २५) आणि गोविंदा रामप्यारे जयस्वाल (वय २३, सर्व रा. बोपोडी) अशी टक केलेल्यांची नावे आहेत.

पुणे : सिग्नल तोडून पळून जाणाऱ्याला दुचाकीचालकाला थांबविल्याच्या रागातून त्याने साथीदारांच्या मदतीने पोलिस अंमलदाराला धक्काबुक्की केली. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी चार जणांना अटक केले आहे. ही घटना रविवारी (ता. २४) संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास कोरेगाव पार्क जंक्शन चौकात घडली.

पुण्यात मटणाचे दर का वाढले?; जाणून घ्या 4 प्रमुख कारणे​ 
आरोपींनी पोलिसाला धक्काबुक्की करीत ढकलून दिले. त्यामुळे अंमलदार जखमी झाले आहेत. शशिकांत पंचलाल जयस्वाल (वय २०), देवेंद्र रामप्यारे जयस्वाल (वय २१), दीपक रामप्यारे जयस्वाल (वय २५) आणि गोविंदा रामप्यारे जयस्वाल (वय २३, सर्व रा. बोपोडी) अशी टक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार नवनाथ पवार यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस अंमलदार पवार हे रेगाव पार्क जंक्शन चौकात वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी शशिकांत जयस्वाल सिग्नल तोडून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे पवार यांनी त्याला थांबण्यास सांगितले. त्याचा राग आल्यामुळे शशिकांतने त्याचा साथीदार देवेंद्रला बोलावून घेतले.

पोलिसांना काय अधिकार आहे थांबवायचा, तुझी नोकरी घालवतो असे म्हणत ते पवार यांच्या अंगावर धावून गेले. त्यांना खाली ढकलून देत जखमी केले. त्यानंतर इतर साथीदारांना बोलावून आरोपींनी पवार यांना शिवीगाळ केली. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे करीत आहेत. 

 

पुण्यात १३ तृतीयपंथीयांना अटक; सिग्नलवर वाहनचालकांना धमकावून उकळायचे पैसे​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The four were arrested by the police after they broke the signal and fled

Tags
टॉपिकस
Topic Tags: