चारचाकी वाहने लंपास करणाऱ्या टोळीला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

चारचाकी वाहने लंपास करणाऱ्या टोळीला अटक

वाघोली : वाहने भाडेतत्वावर लावून देण्याचे आमिष दाखवून 28 वाहने (कार, जीप) लंपास करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट सहाने जेरबंद केले. त्यांच्या कडून 13 वाहने हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. मलिक बाबा शहा ( वय 38, रा कोंढवा ) , ओंकार ज्ञानदेव वाटाणे ( वय 28, रा. हिंगणी बेरडी, दौंड ), मोहमद मुजीब मोहमद बसीर उद्दीन (वय 48, रा हैद्राबाद) यांना अटक करण्यात आली आहे. (Pune News)

हेही वाचा: तालिबानच्या उदयावर पंतप्रधान मोदींचं अत्यंत सूचक विधान

या प्रकरणी अविनाश बालाजी कदम (वय 40, रा हडपसर) यांनी फिर्याद दिली. कदम हे ओलाची कार चालवतात. मलिक बाबा शहा ची ओळख कार मधेच झाली. शहा याने आपण नोएडा येथील युनायटेड एस एफ सी सर्विस नेटवर्क टॉवर्स कंपनीत कामाला असून वाहने भाडे तत्वावर लावण्याचे काम करतो असे आमिष दाखवले. चार महिन्याच्या काळात त्याने 28 वाहने भाडे तत्वावर लावण्याचे कारण देऊन त्यांच्या कडून घेतले. यानंतर तो फरार झाला. कदम यांनी उत्तर प्रदेश येथे जाऊन सदर कंपनी बाबत माहिती घेतली असता तेथे कोणतीही कंपनी अस्तित्वात नसल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी फिर्याद दिली.

हेही वाचा: राज्यातील कोरोना रुग्णांच्या वेगाबाबत राजेश टोपे यांचं अत्यंत सूचक विधान, म्हणालेत...

या कार पैकी एक कार दौंड येथे विक्रीस आणल्याचे युनिट सहाला कळाल्यानंतर त्यांनी दौंड येथे सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडील 13 वाहने महाराष्ट्रातील नांदेड व तेलंगणा मधील बालकोंडा जिल्ह्यातून हस्तगत करण्यात आली. इतर 15 वाहने त्यांनी स्क्रॅप मध्ये दिल्याचे कळते. स्क्रॅप घेणारा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, एम वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखीले, शेखर काटे, नितीन शिंदे, प्रतीक लाहीगुडे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश टिळेकर, सचिन पवार, नितीन घाडगे, सुहास तांबेकर, सलीम तांबोळी या टीमने ही कामगिरी केली.

Web Title: Four Wheeler Gang Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..