

Maharashtra Govt Allows Fourth-Year Honours Courses, New Rules Announced
sakal
पुणे : तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम चालवणाऱ्या संलग्न महाविद्यालयांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार चौथे वर्ष सुरू करण्यासाठी स्वतंत्र परवानगी घ्यावी लागणार आहे. पदवीसह पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता असलेल्या महाविद्यालयांना थेट चौथ्या वर्षाचा ऑनर्स अभ्यासक्रम, तर पदव्युत्तरसह पीएच.डी. संशोधन केंद्र असलेल्या महाविद्यालयांना संशोधनासह ऑनर्स (ऑनर्स विथ रिसर्च) अभ्यासक्रम थेट सुरू करता येणार आहे.