जमीन खरेदी प्रकरणात ४३ लाखांची फसवणूक

पतसंस्थेचे कर्ज भरण्यासाठीही वेळोवेळी मोठ्या रकमा दिल्या. मात्र, आरोपींनी पतसंस्थेचे कर्ज न भरता या रकमा स्वतःसाठीच वापरल्या.
crime
crimesakal
Updated on

बारामती : गडदरवाडी (ता. बारामती) (baramati) येथील ७२ गुंठे जमीन खरेदीच्या प्रकरणात विजय अनंतराव सावंत (रा. वसंतनगर, बारामती) यांची ४३ लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी ( city police) अशोक विठ्ठल महानवर (रा. खंडोबाचीवाडी, ता. बारामती), दिलीप विठ्ठल टेंगले (रा. म्हसोबाचीवाडी, पणदरे, ता. बारामती) व राहुल जगन्नाथ वाकुडे (रा. माळेगाव, ता. बारामती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत फिर्यादीत नमूद केले आहे की, मार्च २०१९ मध्ये टेंगले यांच्या ओळखीने गडदरवाडी येथील अशोक महानवर यांची ७२ गुंठे जमीन खरेदी करण्याचे फिर्यादीने ठरवले. हा व्यवहार १० लाख रुपयांना ठरला. यातील एक लाखाची रक्कम धनादेशाद्वारे महानवर यांचे मेहुणे टेंगले यांच्या नावे देण्यात आली. प्रत्यक्षात महानवर यांनी खरेदीखताने केवळ ३२ गुंठे जमीन दिली. जमिनीची नोंद लावण्यासाठी फिर्यादी तलाठ्याकडे गेले असताना अशोक महानवर यांनी चुलते शिवाजी महानवर यांना पाच वर्षे मुदत खरेदीने ही जमीन यापूर्वीच दिल्याचे दिसून आले.

crime
राखी बांधायला आल्या अन् हक्कसोडपत्र देऊन गेल्या!

याबाबत फिर्यादीने विचारणा केली असता त्याने कबुली दिली. राहुल वाकुडे याने जमिनीची नोंद करून देतो, असे आश्वासन फिर्यादीला दिले. प्रत्यक्षात नोंद करून दिलीच नाही. शिवाजी महानवर यांनी खरेदीखत उलटून देण्यासाठी पैशाची मागणी केली. त्या व्यवहारातही फिर्यादीने ६ लाख रुपये भरले. परंतु, या जमिनीवर दोन पतसंस्थांचा बोजा असल्याचे दिसून आले.

crime
डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना ‘लॉटरी’

तसेच, अशोक याने खासगी देवस्थान ट्रस्टकडूनही या जमिनीवर पैसे घेतल्याचे दिसून आले. या नोंदी कमी करण्यासाठी फिर्यादीने ७ लाख ७५ हजार रुपये दिले. पतसंस्थेचे कर्ज भरण्यासाठीही वेळोवेळी मोठ्या रकमा दिल्या. मात्र, आरोपींनी पतसंस्थेचे कर्ज न भरता या रकमा स्वतःसाठीच वापरल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com