
पुणे : कर्जाचे हप्ते थकल्याने खासगी वित्तीय संस्थेने जप्त केलेली मोटार स्वस्तात मिळवून देतो, असे आमिष दाखवून वाहन खरेदी विक्री करणाऱ्या एजंटने पोलिस हवालदाराची चार लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी एजंटवर काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.