तरुणीला एमबीबीएसला अॅडमिशन देतो म्हणाला अन्

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 February 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार हा मूळचा झारखंडमधील रायपूरचा असून त्याची स्वतःची फ्युचर केअर कंन्सलटेन्सी फर्म आहे. त्याने फिर्यादी यांना जागेश्वरील मुंबईतील टेरेना मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्याने तिच्याकडून बॅंकखात्यावर टप्प्याटप्प्याने 29 लाख 15 हजार रुपये घेतले होते. मात्र, मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवून न देता संतोषकुमारने जागेश्वरीची फसवणू

पुणे : मुंबईतील तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने छत्तीसगडमधील तरुणीला 29 लाखांचा गंडा घालणाऱ्यास विश्रांतवाडी पोलिसांनी टिंगरेनगरमध्ये अटक केली आहे. संतोष कुमार सहानी असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी जागेश्‍वरी देवागन यांनी छत्तीसगडमध्ये फिर्याद दिली होती.

गॅस सिलेंडर महागले; सामान्यांच्या खिशाला कात्री

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार हा मूळचा झारखंडमधील रायपूरचा असून त्याची स्वतःची फ्युचर केअर कंन्सलटेन्सी फर्म आहे. त्याने फिर्यादी यांना जागेश्वरील मुंबईतील टेरेना मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्याने तिच्याकडून बॅंकखात्यावर टप्प्याटप्प्याने 29 लाख 15 हजार रुपये घेतले होते. मात्र, मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवून न देता संतोषकुमारने जागेश्वरीची फसवणूक करून पळ काढला होता. त्यानंतर जागेश्वरीने छत्तीसगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तांत्रिक तपासादरम्यान संतोषकुमार पुण्यातील विमानतळ परिसरातील टिंगरेनगरमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छत्तीसगड पोलिस पथकासह विश्रांतवाडी पोलिसांनी टिंगरेनगरमध्ये सापळा रचून संतोषकुमारला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड, पोलिस निरीक्षक रवींद्र कदम, पोलिस उपनिरीक्षक स्वाती ठाकूर, दिनकर लोखंडे, प्रवीण भालचिम, विनायक रामाने, वामन सावंत, झारखंड पोलिस पथकातील रजनीकांत दिवाण, संतोष शर्मा, रवी साव यांच्या पथकाने केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fraud with girl worth Rs 29 lakhs for MBBS admission pune